क्रीडा प्रतिक्रिया
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30
गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय : मॅक्युलम

क्रीडा प्रतिक्रिया
ग लंदाजांची कामगिरी उल्लेखनीय : मॅक्युलमड्युनेडिन : विश्वकप स्पर्धेत मंगळवारी स्कॉटलंडविरुद्धच्या विजयात गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून, फलंदाजीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेन्डन मॅक्युलम याने व्यक्त केली. टीम साऊदी व ट्रेन्ट बोल्ट यांनी अचूक मारा करीत न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला, असेही मॅक्युलम म्हणाला. ६ षटकांत २१ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेणारा बोल्ट सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. साऊदीने ३५ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. बोल्ट व साऊदी यांच्या अचूक मार्यापुढे स्कॉटलंडची ५ षटकांत ४ बाद १२ अशी अवस्था झाली होती. स्कॉटलंड संघाचा डाव १४२ धावांत संपुष्टात आला. विजयानंतर प्रतिक्रिया देताना मॅक्युलम म्हणाला,'बोल्ट व साऊदी हे जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. ते प्रदीर्घ कालावधीपासून कसोटी क्रिकेट खेळत आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा घेतलेला निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरविला तर अधिक आनंद होतो.'फलंदाजांची कामगिरी हा चिंतेचा विषय असल्याचे मॅक्युलमने कबूल केले. न्यूझीलंडने २५.१ षटकांचा खेळ शिल्लक राखून विजय मिळविला असला तरी त्यासाठी त्यांना ७ गड्यांचे मोल द्यावे लागले.