क्रीडामंत्र्यांचा आयओए टोकियो दौरा स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 04:04 IST2020-03-16T04:03:53+5:302020-03-16T04:04:22+5:30
उच्चस्तरीय भारतीय पथकाच्या २५ मार्चच्या टोकियो दौऱ्याला स्थगित देण्यात येत आहे. हे पथक भारताच्या टोकियो आॅलिम्पिकच्या तयारीची समीक्षा करण्यासाठी जाणार होते.

क्रीडामंत्र्यांचा आयओए टोकियो दौरा स्थगित
नवी दिल्ली : कोरोना विषाणू महामारीमुळे क्रीडामंत्री किरेन रिजिजू व आयओएचे वरिष्ठ अधिकारी यांचा मार्च अखेरीस होणारा टोकियो दौरा स्थगित करण्यात आला आहे. त्यांचा दौरा २५ ते २९ मार्च दरम्यान होणार होता. आॅलिम्पिकसाठी भारतीय पथकाच्या तयारीची माहिती घेण्यासाठी हा दौरा होता.
रिजिजू यांनी टिष्ट्वट केले, ‘उच्चस्तरीय भारतीय पथकाच्या २५ मार्चच्या टोकियो दौऱ्याला स्थगित देण्यात येत आहे. हे पथक भारताच्या टोकियो आॅलिम्पिकच्या तयारीची समीक्षा करण्यासाठी जाणार होते.’