शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

आई-वडिलांनी केलेले कौतुक स्पेशल! राहुल आवारेचे पुण्यात जोरदार स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 12:51 IST

इतर खेळाडूंप्रमाणे मीदेखील प्रत्येक लढत जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावत असतो. कधी यश मिळते, तर कधी अपयश...

ठळक मुद्दे जागतिक कुस्ती स्पर्धेत जिंकले कांस्यपदक

पुणे : जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर आई-वडिलांनी केलेले कौतुक माझ्यासाठी स्पेशल आहे. जन्मदात्यांनी केलेल्या या कौतुकामुळे माझा ऊर अभिमानाने भरून आला, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया महाराष्ट्राचा गुणवान मल्ल राहुल आवारे याने मंगळवारी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.कझाखस्तान येथील नूर सुलतान शहरात ही स्पर्धा नुकतीच झाली. यात फ्री स्टाईल प्रकारात ६१ किलो वजन गटामध्ये राहुलने कांस्यपदक पटकावले. या शानदार कामगिरीनंतर तो मंगळवारी संध्याकाळी पुण्यात परतला. यावेळी विमानतळावर त्याचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत झाले. कुस्तीशौकिन, राहुल सराव करतो त्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील सहकारी, मित्र, कुस्ती संघटनेचे तसेच शासनाच्या क्रीडा विभागाचे पदाधिकारी यांनी विमानतळावर गर्दी केली होती. राहुलचे विमानतळावर आगमन होताच सर्वांनी त्याच्या नावाचा जयघोष केला. संकुलातील सहकाऱ्यांनी त्याला उचलून घेत आपल्या लाडक्या खेळाडूचे स्वागत केले. या स्वागताने राहुल भारावून गेला होता. महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, प्रशिक्षक काका पवार, राज्याचे क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, वस्ताद गोविंद पवार, गोकुळ तालमीचे वस्ताद व्यंकट परसे, राहुलचे वडील बाळासाहेब, आई शारदाबाई या वेळी उपस्थित होते............पदक जिंकल्याचे सार्थक झाल्याची भावनाआपल्या भावना व्यक्त करताना राहूल म्हणाला, ‘‘कुस्ती हेच माझे सर्वस्व आहे. इतर खेळाडूंप्रमाणे मीदेखील प्रत्येक लढत जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावत असतो. कधी यश मिळते, तर कधी अपयश. यामुळे कधी कौतुक होते, तर कधी टीकेला सामोरे जावे लागते. या दोन्ही गोष्टींना मी सहजपणे सामोरा जातो. मात्र, ज्यांचे रक्त माझ्या धमन्यांत वाहत आहे, त्या आईवडिलांनी कौतुक केल्यावर मला आकाश ठेंगणे झाले होते. त्यांच्या चेहºयावरील आनंद बघून जागतिक स्पर्धेत पदक जिंकल्याचे सार्थक झाल्याची भावना माझ्या मनात उमटली.’’

टॅग्स :PuneपुणेWrestlingकुस्तीRahul Awareराहुल आवारे