Sneha Gulhane won pre-national rifle shooting competition | स्नेहा गुल्हानेची रायफल प्री-नॅशनल शूटिंग स्पर्धेत बाजी
स्नेहा गुल्हानेची रायफल प्री-नॅशनल शूटिंग स्पर्धेत बाजी

अमरावती : मध्य प्रदेशातील इंदूर येथे नुकत्याच पार पडलेल्या १० मीटर रायफल प्री-नॅशनल शूटिंग स्पर्धेतून अमरावती येथील शार्प शूटिंग अ‍ॅकेडमीची खेळाडू  स्नेहा अमोल गुल्हाने हिची १० मीटर रायफल शूटिंगमध्ये राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली. स्नेहाने ४०० पैकी ३८० गुण पटकावले. ती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत आहे. नोकरी व कुटुंब सांभाळून तिने  जिद्द व अथक परिश्रमाच्या बळावर हे यश मिळविले. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.


Web Title: Sneha Gulhane won pre-national rifle shooting competition
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.