कर्णधार राणीसह सहा हॉकीपटूंची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 04:13 IST2021-05-09T04:12:00+5:302021-05-09T04:13:46+5:30

राणीशिवाय सविता पुनिया, शर्मिला देवी, रजनी, नवज्योत कौर, नवनीत कौर आणि सुशीला या सर्व खेळाडू तसेच विश्लेषक अमृत प्रकाश आणि वैज्ञानिक सल्लागार वेन लोम्बार्ड हे कोरोनामुक्त झाले. सर्व खेळाडू दहा दिवसांच्या ब्रेकनंतर राष्ट्रीय शिबिरात दाखल झाले होते.

Six hockey players including Captain Rani beat Corona | कर्णधार राणीसह सहा हॉकीपटूंची कोरोनावर मात

कर्णधार राणीसह सहा हॉकीपटूंची कोरोनावर मात

नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिच्यासह सहा सहकारी खेळाडूंनी कोरोनावर यशस्वी मात केली. सर्व जण भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात विलगीकरणात होते. (Six hockey players including Captain Rani beat Corona)

राणीशिवाय सविता पुनिया, शर्मिला देवी, रजनी, नवज्योत कौर, नवनीत कौर आणि सुशीला या सर्व खेळाडू तसेच विश्लेषक अमृत प्रकाश आणि वैज्ञानिक सल्लागार वेन लोम्बार्ड हे कोरोनामुक्त झाले. सर्व खेळाडू दहा दिवसांच्या ब्रेकनंतर राष्ट्रीय शिबिरात दाखल झाले होते. २४ एप्रिल रोजी झालेल्या चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मात्र त्यांच्यात कुठलीही लक्षणे नव्हती. ‘मागच्या दोन आठवड्यात देशविदेशातून जी विचारपूस झाली, जे प्रेम आणि आपुलकी मिळाली, त्याबद्दल सर्वांची आभारी आहे,’ असे राणी म्हणाली,‘ कोरोनाबाधित आणि त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहनदेखील राणीने केले आहे.

Web Title: Six hockey players including Captain Rani beat Corona