शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधूची विजेतेपदाची हॅट्ट्रिक

By admin | Updated: November 30, 2015 00:58 IST

जागतिक क्रमवारीतील १२ वी मानांकित खेळाडू भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने १ लाख २0 हजार डॉलर बक्षीस रकमेच्या मकाऊ ओपन ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी महिला एकेरीत चॅम्पियन बनण्याचा बहुमान मिळवला

मकाऊ : जागतिक क्रमवारीतील १२ वी मानांकित खेळाडू भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने १ लाख २0 हजार डॉलर बक्षीस रकमेच्या मकाऊ ओपन ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी महिला एकेरीत चॅम्पियन बनण्याचा बहुमान मिळवला. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत सहाव्या मानांकित जपानच्या मिनात्सू मितानी हिचा २१-९, २१-२३, २१-१४ असा एक तासाच्या रंगतदार लढतीत पराभव करताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.त्याचबरोबर सिंधूने सलग तिसऱ्यांदा मकाऊ ओपनचे विजेतेपद पटकावताना विजेतेपदाची हॅट्ट्रिकही पूर्ण केली. सिंधूने २0१४ मध्ये कोरियाच्या किम यो मिन आणि २0१३ मध्ये कॅनडाच्या ली मिशेल हिचा फायनलमध्ये पराभव करताना विजेतेपद पटकावले होते.जागतिक क्रमवारीतील १८ वी मानांकित मिनात्सू आणि १२ व्या मानांकित सिंधू यांच्यात ही दुसरी लढत होती आणि या विजयाबरोबरच तिने जपानी खेळाडूविरुद्ध जपान ओपनमध्ये पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा हिशेबही चुकता केला.या सामन्यात सिंधूला मिनात्सूने कडवी झुंज दिली; परंतु भारतीय खेळाडूने प्रतिस्पर्धी खेळाडूच्या एकाच्या तुलनेत सात गेम पॉइंट मिळवले आणि सलग पाच गुणही जिंकले. तिने एकूण ६३ गुण जिंकताना चषकावर कब्जा केला.पहिल्या गेममध्ये आत्मविश्वास उंचावलेल्या सिंधूसमोर मिनात्सू तग धरू शकली नाही आणि एकवेळ हैदराबादच्या या खेळाडूने प्रतिस्पर्धी जपानच्या खेळाडूला १६-५ ने मागे टाकले व हा गेम सिंधूने २१-९ असा सहज जिंकताना १-0 अशी आघाडी मिळवली; परंतु दुसऱ्या गेममध्ये जागतिक क्रमवारीतील १८ व्या मानांकित खेळाडूने जोरदार मुसंडी मारली आणि सिंधूला कडवी झुंज दिली. तिने सलग गुण मिळवले आणि सापसिडीप्रमाणे या गेममध्ये ९-९ आणि १६-१६ अशी बरोबरी साधली व हा गेम २३-२१ असा जिंकताना सामन्यात १-१ अशी बरोबरी साधताना चुरस वाढवली. तथापि, तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये जपानी खेळाडू आत्मविश्वास हरवून बसली. सिंधूने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखताना ९-३ अशी आघाडी घेतली व हा गेम २१-१४ असा जिंकत विजेतेपद पटकावले.हा शानदान विजय आहे. विजयामुळे मी खरच खूप आनंदीत आहे. स्पर्धेतील माझी कामगिरी एकूणच चांगली झाली. अंतिम सामन्याती लपहिला स्पेल सोपा ठरला. परंतु, दुसऱ्या गेममध्ये तिने चांगला खेळ केला. गेममध्येच मला खेळ संपवायला हवा होता. परंतु, मी महत्त्वाच्या वेळेला दोन चुका केल्या. ही खूप निराशाजनक गोष्ट होती. तिसऱ्या गेममध्ये मात्र मी आघाडी मिळवली आणि ती टिकवली. विजयामुळे खूपच आनंदीत आहे. मितानी ही चांगली खेळाडू असून जपान ओपनमध्ये मला तिने हरविले होते. या पराभवाची मी आज परतफेड केली.