शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

अरनॉल्ड क्लासिक स्पर्धेसाठी भारताकडून सिध्दांत मोरेची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 18:21 IST

आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेसाठी स्पेनला होणार रवाना

मुंबई : भारताचा उदयोन्मुख शरीरसौष्ठव पटू सिध्दांत मोरेची १९ ते २२ सप्टेंबर बार्सिलोना स्पेन येथे होणाऱ्या अरनॉल्ड क्लासिक मेन्स अम्याच्यूअर बॉडीबिल्डिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यापूर्वीपण सिध्दांतने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी केलेली असून खेळासोबतच अभिनय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे .जगात अतिशय मानाची व प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे .या स्पर्धेला स्वतः अरनॉल्ड स्वगनायझर व इंटरनॅशनल फेडरेशन चे अध्यक्ष डॉ .राफेल सॅन्टोझा उपस्तिथ असतात .जगातून १५० पेक्षा अधिक देश या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.सिध्दांत हा मराठवाड्यातील पहिलाच खेळाडू या स्पर्धेत आपले प्रयत्न ,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आपले नशीब आजमावणार आहे .त्याच्याकडून पदकाची अपेक्षा असून तशी शैलीदार शरीर प्रकृती व उंचीच्या जोरावर तो स्पर्धेत सहभागी होणार आहे त्याने या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत करून अतिशय पिळदार शरीर बनवले आहे .सिध्दांत मोरे याने कलासिक १८० सेमी गटामध्ये " भारत श्री " होण्याचा मान पटकावला आहे सिध्दांत ने यापूर्वी २०१५ मध्ये जपान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत रजत पदक मिळवले २०१४ मध्ये श्रीलंका येथील स्पर्धेत सहावा क्रमांक प्राप्त केला होता .सिध्दांत ने राज्य राष्टीय ,आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे मिळविली असून भारतातील सर्वात कमी वयात उत्कृष्ट कामगिरी करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे .चित्रपट अभिनेता व खेळाडू अशी दुहेरी भूमिका तो साकारत आहे .

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवIndiaभारत