Sania Mirza : भारत-पाक सामन्यावेळी तुम्ही कोणाला सपोर्ट करता? शोएब मलिकच्या प्रश्नाला सानिया मिर्झाने दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 16:30 IST2021-11-28T16:28:23+5:302021-11-28T16:30:03+5:30
Sania Mirza : अलीकडेच ज्यावेळी टी-20 विश्वचषक झाला, त्यावेळी सानिया मिर्झा सतत आपल्या पती शोएब मलिकला स्टेडियममध्ये सपोर्ट करताना दिसली होती.

Sania Mirza : भारत-पाक सामन्यावेळी तुम्ही कोणाला सपोर्ट करता? शोएब मलिकच्या प्रश्नाला सानिया मिर्झाने दिले उत्तर
नवी दिल्ली : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक ही जोडी नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच ज्यावेळी टी-20 विश्वचषक झाला, त्यावेळी सानिया मिर्झा सतत आपल्या पती शोएब मलिकला स्टेडियममध्ये सपोर्ट करताना दिसली होती. दरम्यान, या दोघांचा आणखी एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सानिया मिर्झा आणि शोएब मलिक एका पाकिस्तानी शोमध्ये सहभागी होण्यासाठी आले आहेत.
शोच्या अँकरने Behind The Scene मोमेंटमध्ये सानिया मिर्झाला एक प्रश्न विचारला. यावेळी अँकरने सानिया मार्झाला विचारले की, तुम्हाला कोणत्या प्रश्नांवर राग येतो. ज्यावर सानिया मिर्झा म्हणाली की, मी लोकांना वारंवार सांगते की भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान ती कोणाला सपोर्ट करते असा प्रश्न विचारू नका, हा खूप कंटाळवाणा प्रश्न झाला आहे. मात्र, तितक्यात या व्हिडिओत सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकने एंट्री घेतल्याचे दिसून येते.
यावेळी शोएब मलिक हा सानिया मिर्झाला म्हणतो की, हे अजून संपले नाही. भारत-पाकिस्तान सामना झाला की तुम्ही कोणाला पाठिंबा देता ते सांगा. यावर सानिया मिर्झानेही लगेच उत्तर देताना विचारले की, जेव्हा टेनिसमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना असतो, तेव्हा तुम्ही कोणाला सपोर्ट करता? त्यावर शोएब मलिकने उत्तर दिले की, मी माझ्या पत्नीला सपोर्ट करतो, पण माझ्या देशावर प्रेम करतो. ज्यावर सानिया म्हणाली की, माझेही तेच उत्तर आहे, त्यामुळे मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक सध्या कराचीमध्ये आहेत, दोघेही अनेक टीव्ही शोमध्ये भाग घेताना दिसतात. दरम्यान, टी-20 विश्वचषकानंतर शोएब मलिक बांगलादेश मालिका खेळण्यासाठी आला होता, मात्र मुलाच्या प्रकृतीमुळे त्याला परत यावे लागले.