शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

शिवालिंगम, जितूचे सुवर्ण

By admin | Updated: July 29, 2014 06:03 IST

भारताच्या सतीश शिवालिंगमने २० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात तसेच जितू राय यांनी ५० मीटर पिस्तूल प्रकारात सोमवारी सुवर्णपदके जिंकली

ग्लास्गो : भारताच्या सतीश शिवालिंगमने २० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात तसेच जितू राय यांनी ५० मीटर पिस्तूल प्रकारात सोमवारी सुवर्णपदके जिंकली. भारोत्तोलनात रवी काटलू तसेच नेमबाजीत गगन नारंग आणि गुरपालसिंग यांनी रौप्य जिंकण्याची कामगिरी केली. २२ वर्षांच्या शिवालिंगमने ७७ किलो वजन गटात नवीन स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदकावर हक्क प्रस्थापित केला. रवी काटलूला रौप्य तसेच आॅस्ट्रेलियाच्या फ्रान्कोइस इटोंडीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. नेमबाजीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेला राय याने पहिल्याच राष्ट्रकुलमध्ये १९४.१ गुणांसह पहिले पदक जिंकले. गुरपालने १८७.२ गुणांसह पहिले रौप्यपदक मिळविले. आॅस्ट्रेलियाचा डॅनिअल रेपाचोली तिसऱ्या स्थानावर राहिला. गगन नारंग याने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्याची कमाई केली.भारतीय भारोत्तोलनपटूंनी चौथ्या दिवशीसुद्धा आपली पदके जिंकण्याची मोहीम सुरू ठेवली होती. तमिळनाडू येथील वेल्लूरच्या २२ वर्षी शिवालिंगमने एकाग्रता आणि ताकदीच्या जोरावर एकूण ३२८ किलो वजन उचलून या स्पर्धेत नवीन स्पर्धा विक्रम नोंदवत या स्पर्धेतील भारताचे सहावे सुवर्ण जिंकले. काटलूने ३१७ किलो वजन उचलून रौप्यपदक आपल्या नावावर केले. इटोंडीने ३१४ किलो उचलले. त्याने स्नॅचमध्ये १३७, तर क्लिन अ‍ॅन्ड जर्कमध्ये १७७ किलो वजन उचलले. नवी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेचा सुवर्ण पुरुष नेमबाज गगन नारंग याला मात्र ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्यावर समाधान मानावे लागले. नारंगने १९३.४ गुणांची नोंद केली. आॅस्ट्रेलियाचा वॉरेन पेटंट याने १९४.० गुणांसह सुवर्ण जिंकले तर इंग्लंडचा केनेथ पार याने १८८ गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. नारंगने आपल्या प्रकारात पात्रता फेरीत ६२०.५ गुणांची नोंद करीत तिसरे स्थान घेतले होते. (वृत्तसंस्था)