शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शिर्के, गांगुली यांना घ्यावा लागणार ब्रेक

By admin | Updated: January 13, 2017 01:27 IST

लोढा समितीने प्रशासकीय सुधारणांबाबत बीसीसीआयसाठी सात बाबी अनिवार्य करताना स्पष्ट केले की

नवी दिल्ली : लोढा समितीने प्रशासकीय सुधारणांबाबत बीसीसीआयसाठी सात बाबी अनिवार्य करताना स्पष्ट केले की, बीसीसीआयचे पदमुक्त सचिव अजय शिर्के यांना बीसीसीआयच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. बंगाल क्रिकेट संघटनेचे (कॅब) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासाठीही विशेष आनंदाचे वृत्त नाही. कारण जून २०१७ नंतर त्याला तीन वर्षांसाठी अनिवार्य ब्रेकला सामोरे जावे लागणार आहे. कारण राज्य संघटनेचे सचिव व अध्यक्ष म्हणून त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्याचसोबत स्पष्ट करण्यात आले आहे की, क्रिकेट प्रशासनातील कार्यकाळ (राज्य व बीसीसीआय) संयुक्तपणे नऊ वर्षे राहणार आहे. सुरुवातीला हा कार्यकाळ १८ वर्षांचा राहणार असल्याचे म्हंटले गेले होते. कॅबचे कोषाध्यक्ष विश्वरूप डे यांची प्रशासकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. कारण दोन वर्षे सहायक सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. सहायक सचिव हे पदाधिकारी पद मानले गेले आहे. त्यामुळे राज्य संघटनेत त्यांचा संयुक्त कार्यकाळ १० वर्षांचा झालेला आहे. राजस्थान क्रिकेट संघटना व हैदराबाद क्रिकेट संघटनेबाबत विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात बोलताना समितीने स्पष्ट केले की, जर एखाद्या संघटनेविरुद्ध कुठले प्रकरण प्रलंबित नसेल तर तेथे नव्या सुधारणेसह निवडणूक घेता येईल. छत्तीसगड राज्य संघटनेचे अध्यक्ष बलदेव भाटिया यांना अनिवार्य ब्रेक घ्यावा लागणार आहे. कारण राज्य संघटनेच्या सदस्यपदाचा त्यांचा कार्यकाळ जोडण्यात आला आहे. दरम्यान, बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या गांगुलीबाबत बोलताना समितीने स्पष्ट केले की, काही महिन्यांसाठी त्यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविता येईल. (वृत्तसंस्था) जर एखादा व्यक्ती कुठल्या राज्य संघटनेचा सदस्य म्हणून दोन वर्षे पदाधिकारी असेल तर त्या व्यक्तीला तीन वर्षांच्या ब्रेकचा नियम लागू न करता पुढील निवडणूक लढण्यासाठी पात्र ठरेल का? याचे उत्तर हो असेल तर त्याचा कार्यकाळ किती राहील? याबाबत समितीने स्पष्ट केले की, जर निवडणुकीच्या वेळी या पदाधिकाऱ्याने तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नसेल तर तो निवडणूक लढवण्यास पात्र आहे, पण त्याला कार्यकाळ पूर्ण करता येणार नाही. सलग तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याला ताबडतोब पद सोडावे लागेल. पदाचा चुकीचा वापर करू नये यासाठी हे कलम वापरण्यात आले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास एखादा पदाधिकारी दोन वर्षे व नऊ महिन्यांच्या कार्यकाळानंतर राजीनामा देऊ शकतो आणि तीन महिन्यानंतर पुन्हा नव्या कार्यकाळासाठी दावा सादर करू शकतो. विश्वरूप डे यांचा दावा होता की, त्यांची सहायक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते निवडणुकीमध्ये सहभागी झाले नव्हते. त्यांचा दावा फेटाळून लावताना कॅबच्या घटनेनुसार संयुक्त सचिव हे पदाधिकारी पद असल्याचे मानल्या गेले आहे. (वृत्तसंस्था)  लोढा समितीला सर्वाधिक प्रश्न शिर्के यांच्या प्रवेशाबाबत विचारण्यात आला. अपात्र ठरविण्यात आलेला पदाधिकारी सदस्य संघटना किंवा बीसीसीआयचा प्रतिनिधी किंवा नामनिर्देशित प्रतिनिधी म्हणून भूमिका बजावू शकतो का? अशी व्यक्ती राज्य संघटना किंवा बीसीसीआयतर्फे कुठली भूमिका बजावण्यास पात्र आहे का?  या प्रश्नांचे उत्तर देताना लोढा समितीने स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश बघितल्यानंतर कुठलाही अपात्र पदाधिकारी क्रिकेट प्रशासनामध्ये सहभागी होऊ शकत नाही. सदस्य संघटना किंवा बीसीसीआयचा प्रतिनिधी म्हणून नामनिर्देशित करण्यासाठी असा पदाधिकारी अपात्र ठरतो. सदस्य संघटना किंवा बीसीसीआयमध्ये अशा व्यक्तीला कुठलीही भूमिका बजावता येणार नाही. संघटनेमध्ये सल्लागार किंवा आश्रयदाते म्हणूनही अशा व्यक्तीला भूमिका बजावता येणार नाही आणि कुठल्या परिषदेचे सदस्यही होता येणार नाही.