शमीची कमी जाणवेल, परंतु कांगारूंना भिडायला सज्ज - ढोणी
By Admin | Updated: January 11, 2016 17:39 IST2016-01-11T17:38:38+5:302016-01-11T17:39:25+5:30
शमी हा संघासाठी मौल्यवान खेळाडू होता आणि त्याची कमी भासेल असं ढोणीनं पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

शमीची कमी जाणवेल, परंतु कांगारूंना भिडायला सज्ज - ढोणी
>ऑनलाइन लोकमत
पर्थ (ऑस्ट्रेलिया) दि. ११ - भारत व ऑस्ट्रेलियामधल्या बहुप्रतिक्षित एकदिवसीय मालिकेला उद्या वाकाच्या वेगवान खेळपट्टीवर सुरूवात होत आहे. भारतीय संघामध्ये समावेश झालेल्या नवोदितांना केवळ शोभेसाठी नेलं नसून त्यांना निश्चित संधी मिळेल असे कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने स्पष्ट केले आहे. दुखापतीमुळे दौरा सुरू होण्यापूर्वीच परतावं लागलेला मोहम्मद शमी हा संघासाठी मौल्यवान खेळाडू होता आणि त्याची कमी भासेल असं ढोणीनं पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
शमी हा डावाच्या सुरुवातीला अथवा शेवटी अशा कुठल्याही वेळी उपयुक्त गोलंदाजी करू शकतो, त्यामुळे त्याच्यासारखा गोलंदाज महत्त्वाचा असतो असं ढोणीनं म्हटलं आहे.
मनिष पांडे व गुरुकिरत सिंग असे दोन नवोदित फलंदाज संघात आहेत. दोघांपैकी एकाला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संधी देण्यात येणार असल्याचे ढोणी म्हणाला.