शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुखसाठी वानखेडेवर ‘नो एंट्री’ कायम

By admin | Updated: May 12, 2015 00:36 IST

बॉलिवूडचा बादशाह आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक शाहरुख खान हा सलग तिसऱ्या वर्षी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करू शकणार नाही.

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक शाहरुख खान हा सलग तिसऱ्या वर्षी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करू शकणार नाही. १६ मे २०१२ रोजी मुंबईवर केकेआरने विजय नोंदविल्यानंतर शाहरुखने वानखेडेवर तंटा केल्यानंतर शाहरुख तसेच सुरक्षारक्षक आणि मुंबई क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱ्यांसोबत खडाजंगी झाली होती. या घटनेनंतर एमसीएने त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घातली. यंदा १४ मे रोजी केकेआर-मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात त्याची उपस्थिती राहणार नाही. एमसीए अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदी सुरू असलेल्याने शाहरुखला प्रवेशाची परवानगी नाकारली जाईल. गेल्या वर्षी शाहरुखवरील बंदी अस्थायी स्वरूपात हटविण्याची इच्छा एमसीएने दर्शविली होती. २ जून रोजी आयोजित अंतिम सामन्याला शाहरुखला उपस्थित राहता यावे, असा यामागे हेतू होता; पण बीसीसीआयने हा अंतिम सामना नंतर बंगळुरुला हलविला. मागच्या आठवड्यात बे्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या केकेआर-राजस्थान रॉयल्स या सामन्यादरम्यान शाहरुख उपस्थित होता. हे स्टेडियम वानखेडेपासून थोड्याच अंतरावर आहे. यंदा रॉयल्सने ३ सामन्यांसाठी ब्रेबॉर्नला स्थानिक स्टेडियम बनविले होते. याशिवाय, चार स्थानिक सामने त्यांनी अहमदाबादच्या मोतेरा मैदानावर खेळले. (वृत्तसंस्था)