शाहीद आफ्रिदी पडला आजारी
By Admin | Updated: March 15, 2016 17:24 IST2016-03-15T17:12:52+5:302016-03-15T17:24:18+5:30
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कप्तान शाहीद आफ्रिदी आजारी पडला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार आजारपणामुळे शाहीद आफ्रिदीने मंगळवारी प्रॅक्टीस सेशनमध्येदेखील भाग घेतला नाही

शाहीद आफ्रिदी पडला आजारी
>
ऑनलाइन लोकमत -
कोलकाता, दि. १५ - टी20 वर्ल्ड कपच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे मात्र त्याअगोदरच पाकिस्तान संघाला धक्का बसला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कप्तान शाहीद आफ्रिदी आजारी पडला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार आजारपणामुळे शाहीद आफ्रिदीने मंगळवारी प्रॅक्टीस सेशनमध्येदेखील भाग घेतला नाही. बुधवारी पाकिस्तान क्रिकेट संघ आणि बांगलादेश आमनेसामने असणार आहेत.
अधिकृतरित्या यासंबंधी माहिती देण्यात आलेली नाही मात्र बुधवारपर्यंत शाहीद आफ्रिदीची तब्बेत बरी होईल असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे बांगलादेशविरोधात होणा-या सामन्यात शाहीद आफ्रिदी खेळेल अशी शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे कोच वकार युनिस यांनीदेखील शाहीद आफ्रिदीची तब्बेत लवकरच बरी होईल अशी आशा व्यक्त केली आहे.