आज ठरणार दुसरा ‘क्वालिफायर’
By Admin | Updated: September 16, 2014 01:41 IST2014-09-16T01:41:37+5:302014-09-16T01:41:37+5:30
एक्स्प्रेस संघावर दमदार विजय साजरा करून विजयाची एक्स्प्रेस पकडणा:या मुंबई इंडियन्सला चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवण्याची उद्या, मंगळवारी शेवटची संधी आहे.

आज ठरणार दुसरा ‘क्वालिफायर’
रायपूर : एक्स्प्रेस संघावर दमदार विजय साजरा करून विजयाची एक्स्प्रेस पकडणा:या मुंबई इंडियन्सला चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवण्याची उद्या, मंगळवारी शेवटची संधी आहे. सलग दोन विजय साजरे करून मुख्य फेरीत प्रवेश निश्चित करणा:या तगडय़ा नॉर्थन डिस्ट्रिक संघाशी त्यांची गाठ आहे. आपले आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना या लढतीत विजय मिळवणो आवश्यक आहे. शिवाय मंगळवारी होणा:या पहिल्या क्वालिफायर लढतीत एक्स्प्रेसकडून लाहोर लायन्सच्या पराभवाची इंडियन्सला प्रार्थना करावी लागेल.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सचे खचलेले मनोबल लाहोर लायन्सविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर लढतीत सर्वानी पाहिले. त्याचा परिणाम निकालावर झाला. हा पराभव इंडियन्ससाठी ‘वेक अप कॉल’च होता. दुस:या क्वालिफायर लढतीत संघात बराच सकारात्मक बदल पाहायला मिळाले. तगडय़ा फलंदाजांची फौज काय करू शकते, याचा प्रत्ययच एक्स्प्रेसविरुद्धच्या लढतीत पाहायला मिळाला. मायकल हसी, लेंडल सिमन्स आणि किरॉन पोलार्ड यांनी एक्स्प्रेसच्या गोलंदाजांच्या चिंधडय़ा उडवल्या; परंतु इंडियन्सच्या गोलंदाजांची हालत काही निराळी नव्हती. फलंदाजीत तगडा वाटणा:या इंडियन्ससाठी गोलंदाजी ही डोकेदुखी ठरू शकते. हरभजन सिंग, लसिथ मलिंगा, प्रग्यान ओझा, प्रवीण कुमार हे गोलंदाज असले तरी त्यांना अद्याप लय सापडलेली नाही. हसी, सिमन्स आणि पोलार्ड वगळता आदित्य तरे, अंबाती रायडू हे फलंदाज आहेतच शिवाय कोरी अँडरसनसारखा अष्टपैलू खेळाडूही महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज आहे.
दुसरीकडे नॉर्थनकडे फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही क्षेत्रत अचूक आणि चांगली कामगिरी करणारे खेळाडू आहेत. त्यामुळे फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही मुंबई संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या क्वालिफायरमध्ये एक्स्प्रेसला 7 विकेट्स राखून नमवले होते, तर दुस:या लढतीतही लाहोर लायन्सला 98 धावांत गुंडाळून 72 धावांच्या विजयासह नॉर्थनने मुख्य फेरीत प्रवेश केला. त्यांच्याजवळ अॅन्टॉन डेवसिच, केन विलियमन्सन, डॅनिएल हॅरिस, डॅनिएल फ्लॅन आणि बी. जे. वॉटलिंग ही फलंदाजांची फौज आहे, तर गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी, इश सोधी आणि स्कॉट स्टायरिस हे हुकमी व अनुभवी गोलंदाज आहेत. त्यामुळे इंडियन्ससाठी ही लढत खडतर असेल. (वृत्तसंस्था)
लायन्सला मोठय़ा विजयाची गरज
एक विजय आणि एक पराभव पत्करणा:या लाहोर लायन्सला मुख्य फेरीत प्रवेश मिळवण्याकरिता अंतिम क्वालिफायर लढतीत एक्स्प्रेसवर मोठा विजय मिळवण्याची आवश्यकता आहे. गुणतालिकेत तिस:या क्रमांकावर असलेल्या या संघाची सरासरी -1.49 इतकी असल्याने त्यांना एक्स्प्रेवर दणदणीत विजय मिळवणो गरजेचे आहे. त्याचबरोबर इंडियन्सचा पराभवही त्यांच्या फायद्याचा आहे. दुसरीकडे एक्स्प्रेसने दोन्ही लढतीत पराभव पत्करल्याने त्यांचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आल्याने जाता जाता विजय मिळवण्याचा त्यांचा प्रय} असेल.
प्रवीणकुमार स्पर्धेबाहेर,
मुंबईला दुसरा धक्का
रायपूर : कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे आधीच कोलमडलेल्या मुंबई इंडियन्स संघाला दुसरा मोठा धक्का बसला असून, संघाचा मुख्य भारतीय जलदगती गोलंदाज प्रवीण कुमार खांदा दुखावल्यामुळे चॅम्पियन्स लीगमधून बाहेर झाला आहे. चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात त्याचा डावा खांदा दुखावला होता. यामुळे तो संपूर्ण स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्याच्यावर उपचार सुरु असून दुखापतीचा रिपोर्ट अजून मिळालेला नाही. दरम्यान, प्रवीणकुमारच्या जागी पवन सुयालचा मुंबई इंडियन्समध्ये समावेश करण्यात आला आहे.