शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

स्कोअरिंग ठरेल विजयाचे गुपित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 16:29 IST

ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे बुद्धिबळ स्पर्धेसाठी गोव्यात

ठळक मुद्दे३७ वर्षीय ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे याने भारतीय बुद्धिबळासाठी मोठे योगदान दिले आहे.

सचिन कोरडे : एकाच वेळी १५५ मुलांविरुद्ध सतत साडेआठ तास खेळण्याचा विक्रम नोंदवणारा महाराष्ट्राचा ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे सध्या गोव्यातील पहिली ग्रॅण्डमास्टर्स ओपन बुद्धिबळ स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज आहे. या स्पर्धेचा दावेदार म्हणूनही त्याच्याकडे पाहिलेजात आहे. जगातील आघाडीच्या ग्रॅण्डमास्टर्सना टक्कर देण्यासाठी त्याने काही व्यूहरचनाही आखल्या आहेत. स्पर्धेत खेळाडूंची संख्या अधिक असल्याने केवळ विजय किंवा ‘ड्रॉ’वर लक्ष ठेवून चालणार नाही तर स्कोअरिंगवरच लक्ष केंद्रित करावे लागेल, असे अभिजितने ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर शनिवारी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला. या वेळी अत्यंत शांत आणि नम्र असलेल्या अभिजितने गोमंतकीय कला-संस्कृती दर्शनाचा लाभ घेतला. त्याने गोव्याच्या आठवणीही सांगितल्या. तो म्हणाला, १९८७ मध्ये मडगाव येथे राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धा आणि त्यानंतर २००२-०३ साली विश्व ज्युनियर स्पर्धा खेळण्यासाठी मी गोव्यात आलो होते. खूप वर्षांनतर आता पहिल्यांदाच गोव्यात आलो आहे. तेव्हाच्या आणि आताच्या बुद्धिबळातील वातावरणात खूप बदल झालेला आहे. मोठ्या पातळीवर ही स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित केली जात आहे. ही स्पर्धा येथेच व्हावी, अशी अपेक्षा आहे; कारण या स्पर्धेमुळे गोव्यातील नव्हे तर शेजारील राज्यांतील खेळाडूंना सहभागाची संधी मिळेल. तसेच बुद्धिबळासाठी गोव्यात चांगले वातावरण आहे. काही वर्षांत दर्जेदार खेळाडू गोव्याला मिळाले आहेत. त्यात अनुराग म्हामलच्या रूपाने पहिला ग्रॅण्डमास्टर मिळाला. ७-८ वर्षांपासून तो खेळत आहे. अत्यंत ‘चपळ व तल्लख’ असा हा खेळाडू असूनत्याची मेहनत, सातत्य आणि कौशल्य यामुळेच त्याला इथपर्यंत पोहोचता आले. मी आॅगस्टमध्ये अबुधाबी येथे खेळलो. ही स्पर्धा चुरशीची झाली. समाधानकारक निकाल लागला. अनुभवही चांगला होता. तेथील अनुभव या स्पर्धेसाठी उपयोगी पडेल, असा विश्वास आहे. या स्पर्धेतही १५० खेळाडू हे २००० रेटिंगच्या खाली आहेत. त्यामुळे स्कोअरिंग महत्त्वाचे ठरेल. बरेचदा आपण काही सामने जिंकतो आणि काही सामने अनिर्णित राखतो; पण स्कोअरिंग कमी असेल तर त्याचा फायदा होत नाही. जेव्हा खेळाडूंचा सहभाग मोठा असतो तेव्हा तुम्हाला स्कोअरिंगशिवाय पर्याय नसतो. ३७ वर्षीय ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे याने भारतीय बुद्धिबळासाठी मोठे योगदान दिले आहे. त्याने १९९७, २००० मध्ये सुवर्ण, तर १९९९, २००१, २००३, २००५ मध्ये कांस्यपदक पटकाविले आहे. त्याने २००७ मध्ये बुद्धिबळ विश्वचषकात कांस्य पटकाविले होते.

 बुद्धिबळसाठी निधी कमीच... देशाला काही वर्षांत बरेच ग्रॅण्डमास्टर मिळाले आहेत. या खेळाचे भविष्य कसे दिसते, याबाबत अभिजित म्हणाला की, या खेळासाठी अजूनही निधी कमीच आहे. पाहिजे तसा पैसा या खेळात नाही. बुद्धिबळही आता व्यावसायिक होत आहे. त्यामुळे थोडे पैसे मिळतात; परंतु या खेळातून नोकºया मिळण्याची संधी आणि संख्या कमी झाली आहे. बºयाच राज्यांनी शालेय अभ्यासक्रमात बुद्धिबळचा तास सुरू केलेला आहे. त्यामुळे किती फायदा होईल, असे विचारले असता कुंटे म्हणाला की, निश्चितच ही कल्पना खूप चांगली आहे; परंतु शाळांच्या काही तांत्रिक अडचणी असतात. त्यांच्यावर आपण दबाव आणू शकत नाही. या खेळाची ओळख निर्माण होण्यासाठी आठवड्यातून एकदा एक तास व्हावा, ही कल्पना चांगली आहे.

टॅग्स :Chessबुद्धीबळIndiaभारत