धावफलक

By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:43+5:302015-02-16T21:12:43+5:30

विजय, शंकरने तामिळनाडूला सावरले

Scoreboard | धावफलक

धावफलक

जय, शंकरने तामिळनाडूला सावरले
रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरी : तामिळनाडू ४ बाद २३४
नागपूर : सलामीवीर मुरली विजय आणि विजय शंकर यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावित रणजी करंडक स्पर्धेत तामिळनाडू संघाला विदर्भाविरुद्ध जयपूर येथे सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सोमवारी पहिल्या दिवसअखेर ४ बाद २३४ धावांची मजल मारून दिली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी ९० धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या शंकर याला आर. प्रसन्ना (१०) साथ देत होता.
त्याआधी, विदर्भाने नाणेफेक जिंकून तामिळनाडू संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तामिळनाडूची सुरुवातीला ३ बाद ५० अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मुरली विजय (९६ धावा, २०३ चेंडू, १३ चौकार, २ षटकार) आणि शंकर (नाबाद ९० धावा, २१५ चेंडू, ११ चौकार, १ षटकार) यांनी संयमी फलंदाजी करीत तामिळनाडूचा डाव सावरला. विदर्भाचा वेगवान गोलंदाज श्रीकांत वाघने अभिनव मुकुंदला(११) झटपट माघारी परतवत विदर्भाला पहिले यश मिळवून दिले. त्यावेळी धावफलकावर केवळ १७ धावांची नोंद होती. बाबा अपराजित (१०) चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. दिनेश कार्तिकचा (४) अडथळा ठाकूरने दूर करीत विदर्भाला तिसरे यश मिळवून दिले. त्यानंतर मुरली विजयची साथ देण्यासाठी खेळपट्टीवर आलेल्या व्ही. शंकर याने संयमी फलंदाजी करीत डाव सारवला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी केली. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या मुरली विजयला ठाकूरने तंबूचा मार्ग दाखवित विदर्भाला चौथे यश मिळवून दिले. विदर्भातर्फे ठाकूरने ३१ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले तर वाघने ४० धावांत एका फलंदाजाला माघारी परतवले. (क्रीडा प्रतिनिधी)
नागपूर :
धावफलक
तामिळनाडू पहिला डाव :- अभिनव मुकुंद त्रि. गो. वाघ ११, मुरली विजय झे. फझल गो. ठाकूर ९६, बाबा अपराजित धावबाद (जांगिड) १०, दिनेश कार्तिक झे. फझल गो. ठाकूर ०४, व्ही. शंकर खेळत आहे ९०, आर. प्रसन्ना खेळत आहे १०. अवांतर (१३). एकूण ८७ षटकांत ४ बाद २३४. बाद क्रम : १-१७, २-४१, ३-५०, ४-१९०. गोलंदाजी : एस. वाघ १९-७-४०-१, एस. बंडीवार २२-४-५४-०, आर. ठाकूर १९-७-३१-२, एफ. फझल ११-२-४१-०, आर. ध्रुव १६-१-६१-०.

Web Title: Scoreboard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.