शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

CWG 2022: ११ दिवस, ८ सामने, २ पदके! भावाच्या हातचे जेवण खाऊन 'हा' खेळाडू बनला चॅम्पियन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 13:25 IST

भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ खूप खास ठरली असून यंदाच्या ११ दिवसाच्या स्पर्धेत भारताने विक्रमी पदके जिंकली आहेत.

नवी दिल्ली : भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (CWG 2022) खूप खास ठरली असून यंदाच्या ११ दिवसाच्या स्पर्धेत भारताने विक्रमी पदके जिंकली आहेत. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह एकूण ६१ पदकांवर देशाचे नाव कोरले. तब्बल ७२ देशातील खेळाडू एका मोठ्या व्यासपीठावर जमल्याने स्पर्धेने अवघ्या जगाला आकर्षित केले होते. लक्षणीय बाब म्हणजे पहिल्यांदाच भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये तीन सुवर्ण जिंकले आहेत. महिला एकेरीत पी.व्ही सिंधू (PV Sindhu), पुरूष एकेरीत लक्ष्य सेन आणि पुरूष दुहेरीमध्ये सात्विक साईराज (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टीच्या (Chirag Shetty) जोडीने ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले. यापूर्वी भारताला कधीच पुरूष दुहेरीच्या गटात सुवर्ण मिळाले नव्हते.

बॅडमिंटन खेळाडूंचे व्यस्त वेळापत्रकराष्ट्रकुल स्पर्धेतील बॅडमिंटन खेळाडूंचे वेळापत्रक खूप व्यस्त होते. त्यांना जवळपास सलग ४ दिवस सामने खेळायचे होते. सर्वप्रथम हे खेळाडू मिश्र सांघिक स्पर्धेत उतरले आणि २ तारखेला अंतिम फेरीनंतर ते आपापल्या स्पर्धांना सामोरे गेले. सात्विक आणि चिराग या जोडीला मिश्र स्पर्धेचे सर्व सामने खेळावे लागले. सात्विक फक्त एका सामन्यात खेळू शकला नाही. यानंतर तो त्याच्या श्रेणीमध्ये सुवर्ण पदक जिंकण्यात यशस्वी झाला, ज्यासाठी तो दररोज सामने खेळत होता. अशा परिस्थितीत खेळाडूंसमोर त्यांचा फिटनेस राखण्याचे मोठे आव्हान होते. तसेच थकवा टाळण्याची जबाबदारी असताना याची सर्व जबाबदारी सात्विक साईराज याच्या भावाने चोखपणे पार पाडली. 

भावाने केली सात्विकच्या जेवणाची सोयसात्विकचा भाऊ रामचरन रंकीरेड्डी त्याच्या सोबत बर्गिंहॅमला गेला होता. तो त्याच्या भावासाठी स्वत:च्या हाताने जेवण बनवत होता. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सामना झाल्यानंतर सात्विकला त्याच्या आवडीचे जेवण द्यायची जबाबदारी रामचरनने घेतली होती. सतत सामने खेळून थकवा येणे सामान्य आहे हे त्याला माहिती होते. म्हणूनच तो सात्विकच्या जेवणाची विशेष काळजी घ्यायचा. सात्विकने सांगितले की, राष्ट्रकुल स्पर्धेतील प्रत्येक दोन सामन्यानंतर तो प्रत्येकवेळी जखमी व्हायचा मात्र यावेळी त्याला बरे वाटत आहे. मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून देण्यातही सात्विक आणि चिराग या जोडीचा मोलाचा वाटा होता.

जेवणाच्या बाबतीत भारताची नंबर वन बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू सर्वांपेक्षा पुढे आहे. तिला हवी ती गोष्ट खाण्याकडे सिंधूचा जास्त कल असतो. बर्मिंगहॅममध्ये तिला तिच्या आवडीची बिर्याणी भेटली नाही पण तिने इटालियन खाद्यपदार्थांचा स्वाद घेऊन आनंद लुटला. या स्पर्धेत सिंधूला दोन पदके जिंकण्यात यश आले. तिने मिश्र सांघिक स्पर्धेत सांघिक रौप्यपदक जिंकले, तर एकेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकून तिने पहिल्यांदाच रौप्य पदकाची सीमा ओलांडली. राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूने प्रथमच सुवर्णपदक पटकावले आहे. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाBadmintonBadmintonIndiaभारतGold medalसुवर्ण पदकSilverचांदीPV Sindhuपी. व्ही. सिंधू