शोएब मलिक वाटतो तितका साधा आणि शांत नाही; सानिया मिर्झाने सांगितली ‘मन की बात’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 08:52 AM2021-12-19T08:52:05+5:302021-12-19T08:52:44+5:30

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक ही  जोडी कायम चर्चेत असते.

sania mirza says shoaib Malik is not as simple and quiet as he seems | शोएब मलिक वाटतो तितका साधा आणि शांत नाही; सानिया मिर्झाने सांगितली ‘मन की बात’

शोएब मलिक वाटतो तितका साधा आणि शांत नाही; सानिया मिर्झाने सांगितली ‘मन की बात’

googlenewsNext

कराची : भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक ही  जोडी कायम चर्चेत असते. शोएब मलिक त्याच्या शांत स्वभावासाठी क्रिकेटमध्ये ओळखला जातो. मात्र सानिया मिर्झाला असे वाटत नाही. 

एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सानियाने सांगितले की, ‘शोएब मलिक वाटतो तितका शांत नाही.’ या मुलाखतीत सानियाला ती खोटे बोलते का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने नाही असे उत्तर दिले. त्यानंतर लगेच सूत्रसंचालकाने हुशारीने विचारले की, शोएब मलिक स्वभावाने साधा आहे का? यावर सानियानेही दिलखुलास उत्तर देताना म्हटले की, ‘अजिबात नाही, तो वाटतो तितका साधा नाही.’

Web Title: sania mirza says shoaib Malik is not as simple and quiet as he seems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.