जर मित्रांचं ऐकलं असतं आणि पाकिस्तानी मुलाशी लग्न केलं नसतं...; आता पश्चाताप करतेय सानिया मिर्झा?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 06:35 PM2024-01-26T18:35:34+5:302024-01-26T18:36:16+5:30

...पण घटस्फोटाची घोषणा होण्यापूर्वीच शोएब मलिकने लग्नाचा फोटो शेअर करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

Sania Mirza now regretting says If only friends had listened and not married a Pakistani boy her family and friends were against her marriage with shoaib malik | जर मित्रांचं ऐकलं असतं आणि पाकिस्तानी मुलाशी लग्न केलं नसतं...; आता पश्चाताप करतेय सानिया मिर्झा?

जर मित्रांचं ऐकलं असतं आणि पाकिस्तानी मुलाशी लग्न केलं नसतं...; आता पश्चाताप करतेय सानिया मिर्झा?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिकने नुकतेच अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. यापूर्वी 2010 मध्ये त्याने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबतलग्न केले होते. गल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा होती. मात्र या दोघांनीही यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे उघड भाष्य केले नव्हते. पण, घटस्फोटाची घोषणा होण्यापूर्वीच शोएब मलिकने लग्नाचा फोटो शेअर करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

सानियाने मित्रांचा सल्ला ऐकला नव्हता - 
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या लग्नाची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली होती. तिने सोहराब मिर्झासोबतची एंगेजमेंट मोडून शोएबसोबत लग्न केले होते. सानियाचे काही मित्र आणि जवळच्या लोकांचा तिचा हा विर्णय मान्य नव्हता. मात्र तिने सर्वांच्या विरोधात जाऊन शोएबसोबत लग्न केले. पण आता तिला याचा पश्चाताप होत आहे. पाकिस्तानी पत्रकार नईम हनिफ यांनी हा खुलासा केला आहे. एका शोमध्ये बोलताना, शोएब आणि सनाच्या लग्नानंतर आपण सानिया मिर्झा सोबत फोनवरून संपर्क साधला होता, असे त्यांनी सांगितले.

सानियासोबत काय बोलणे झाले? असे विचारले असता, नईम हनीफ म्हणाले, सानिया बोलली की दुःख खूप आहे. त्यावेळी 14 वर्षांपूर्वी जवळच्या लोकांचा सल्ला ऐकायला हवा होता. त्यावर विचार करायला हवा होता. मला शोएबसोबत लग्न करण्यापासून रोखणाऱ्या माझ्या मित्रांचे ऐकायला हवे होते.

शोएबचे कुटुंबीयही नाखूश -
शोएब मलिकचे कुटुंबही त्याच्या आणि सनाच्या लग्नावर खुश नाहीत. नईम हनीफ यांनी दावा केला की, शोएबची आई, बहीण आणि मेहुणा यांपैकी कुणीही लग्नाला उपस्थित नव्हते. शोएबच्या कुटुंबीयांसंदर्भात सानियाला कसल्याही प्रकारची तक्रार नाही. एवढेच नाही तर, आपल्या करियरमध्ये शोएब मलिकच्या मेहुण्याचे मोठे योगदान आहे असेही सानियाने म्हटल्याचे त्यांनी सांगितेल.

Web Title: Sania Mirza now regretting says If only friends had listened and not married a Pakistani boy her family and friends were against her marriage with shoaib malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.