भारताविरुद्ध पहिल्या कसोटीनंतर संगकाराची निवृत्ती

By Admin | Updated: June 16, 2015 01:53 IST2015-06-16T01:53:26+5:302015-06-16T01:53:26+5:30

श्रीलंकेचा माजी कर्णधार व यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकारा भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या लढतीनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार आहे.

Sangakkara retires from Test cricket | भारताविरुद्ध पहिल्या कसोटीनंतर संगकाराची निवृत्ती

भारताविरुद्ध पहिल्या कसोटीनंतर संगकाराची निवृत्ती

कोलंबो : श्रीलंकेचा माजी कर्णधार व यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकारा भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या लढतीनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार आहे. संगकाराने वन-डे क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती जाहीर केली आहे. संगकाराने आपला निर्णय श्रीलंका क्रिकेट बोर्डाला कळवला आहे, पण बोर्डाने याबाबत निर्णय घेण्यासाठी अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक बोलवली आहे. १३० कसोटी सामने खेळणाऱ्या संगकाराने आपला निर्णय बोर्डाला कळवताना भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान पहिला कसोटी सामना गॉल येथे खेळला जाणार आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने संगकाराच्या अखेरच्या लढतीसाठी गॉल कसोटी सामन्याचे शानदार आयोजन करण्याची घोषणाही केली आहे. बोर्डाच्या मते संगकाराच्या अखेरच्या कसोटी सामन्यासाठी प्रसिद्ध व्यक्तींना आमंत्रित करण्यात येणार आहे.

Web Title: Sangakkara retires from Test cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.