साजन प्रकाशने रचला इतिहास; Olympic मध्ये थेट प्रवेश करणारा ठरला पहिला भारतीय स्वीमर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 10:17 PM2021-06-26T22:17:32+5:302021-06-26T22:20:19+5:30

Olympic साठी थेट क्वालिफाय करणारा ठरला पहिला भारतीय स्वीमर. त्याच्यापूर्वी कोणत्याही स्वीमरला तोडता आला नाही ए क्वालिफिकेशन मार्क.

Sajan Prakash first ever Indian swimmer to make A cut for Olympics created history | साजन प्रकाशने रचला इतिहास; Olympic मध्ये थेट प्रवेश करणारा ठरला पहिला भारतीय स्वीमर

साजन प्रकाशने रचला इतिहास; Olympic मध्ये थेट प्रवेश करणारा ठरला पहिला भारतीय स्वीमर

googlenewsNext
ठळक मुद्देOlympic साठी थेट क्वालिफाय करणारा ठरला पहिला भारतीय स्वीमर. त्याच्यापूर्वी कोणत्याही स्वीमरला तोडता आला नाही ए क्वालिफिकेशन मार्क.

साजन प्रकाश या स्वीमरनं शनिवारी एक इतिहास रचला. रोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या सेटे कॉली ट्रॉफीमध्ये पुरूषांच्या गटात २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत साजननं १ मिनिट ५६.३८ सेकंदाची वेळ घेत क्वालिफाय करणारा पहिला भारतीय स्वीमर बनण्याचा मान मिळवला आहे.

साजननं ही फेरी १ मिनिट ५६.४८ सेकंदाच्या ए क्वालिफिकेशन मार्कपेक्षा चांगली आहे. यापूर्वी सहा भारतीय स्वीमर्सनं २०१९-२० च्या ऑलिंपिक स्पर्धेत क्वालिफिकेशन कालावधीत बी क्वालिफिकेशन मिळवलं होतं. बी क्वालिफिकेशन एक वाईल्ड कार्ड एन्ट्री आहे. 

 
यापूर्वी अनेक भारतीय स्वीमर्सनं ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. परंतु कोणत्याही स्वीमरला थेट ए क्वालिफिकेशन मार्क तोडून थेट क्वालिफाय करण्यात यश मिळालं नव्हतं. यापूर्वी नटराज या स्वीमरला ए क्वालिफिकेशनसाठी यश मिळालं नव्हतं. याच स्पर्धेत १०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत त्याला यात यश मिळालं नव्हतं. ५३.९० सेकंदात त्यानं ही स्पर्धा पूर्ण केली होती.

Web Title: Sajan Prakash first ever Indian swimmer to make A cut for Olympics created history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.