शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सायना, श्रीकांत यांच्या ऑलिम्पिक आशा जवळपास संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 07:46 IST

एक ते सहा जूनदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेला कोरोनामुळे लावण्यात आलेल्या प्रवास निर्बंधनाचा फटका बसला. ‘रेस टू टोकियो’ रँकिंगसाठी महत्त्वपूर्ण गुण मिळवण्यासाठी ही स्पर्धा अखेरची ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होती.

नवी दिल्ली : कोरोना महामारीचा फटका सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेला बसला असून ही स्पर्धा आता रद्द करण्यात आली आहे. मात्र याचा मोठा परिणाम भारताला भोगावा लागणार असून यामुळे आता सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत या अव्वल भारतीयांच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.एक ते सहा जूनदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेला कोरोनामुळे लावण्यात आलेल्या प्रवास निर्बंधनाचा फटका बसला. ‘रेस टू टोकियो’ रँकिंगसाठी महत्त्वपूर्ण गुण मिळवण्यासाठी ही स्पर्धा अखेरची ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होती. बीडब्ल्यूएफने सांगितले की, ‘सर्व खेळाडू, स्पर्धा कर्मचारी व स्थानिक नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षेचा विचार करून ही स्पर्धा रद्द केली आहे.’ स्पर्धेच्या कार्यक्रमात कोणताही बदल होणार नसल्याचेही बीडब्ल्यूएफने स्पष्ट केले. त्याचवेळी ऑलिम्पिक पात्रतेविषयी पुढे सांगण्यात येईल, असेही बीडब्ल्यूएफने सांगितले.सायना, श्रीकांतसाठी निराशासिंगापूर ओपन स्पर्धा सायना व श्रीकांतसाठी महत्त्वाची होती. कारण या स्पर्धेतूनच त्यांचा ऑलिम्पिक प्रवेश निश्चित होणार होता. याआधी सात मे रोजी मलेशिया ओपन स्पर्धाही स्थगित झाली होती. त्यामुळे ऑलिम्पिक प्रवेशाचे सर्व गणित सिंगापूर ओपन स्पर्धेवर निर्भर झाले होते. 

टॅग्स :BadmintonBadmintonSaina Nehwalसायना नेहवालKidambi Srikanthकिदम्बी श्रीकांत