शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 21:15 IST

Saina Nehwal Patch up with Parupalli Kashyap after Divorce Announcement: १३ जुलैला सोशल मीडियावर केली होती वेगळं होण्याची घोषणा

Saina Nehwal Patch up with Parupalli Kashyap after Divorce Announcement: स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिंपिक पदक विजेती सायना नेहवालने २० दिवसांपूर्वी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अपडेट दिली होती. सायना आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) यांनी घटस्फोट घेतल्याची ती बातमी होती. पण आता सायनाने एक आनंदाची बातमी देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. सायनाने जाहीर केले आहे की, ती आणि पारूपल्ली कश्यप दोघेही पुन्हा एकत्र आले आहेत. अवघ्या २० दिवसांतच या जोडप्याने त्यांचा घटस्फोटाचा विचार बदलून पुन्हा एकदा प्रयत्न नाते जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे.

सायनाने सोशल मीडिया स्टोरीद्वारे ही माहिती शेअर करून देशभरातील बॅडमिंटन चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. हल्ली घटस्फोटांचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेक सेलिब्रिटी जोडपी लग्नानंतर काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी वेगळी होताना दिसत आहेत. अशातच सायना आणि पारुपल्ली कश्यप यांनी पॅच-अपचा निर्णय घेतला असल्याने साऱ्यांना आनंद झाला आहे. हे दोघे लग्नाआधी दीर्घ काळ रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी २०१८ मध्ये लग्न केले. पण ७ वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला होता. पण आता मात्र ते पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

तेव्हा सायना काय म्हणाली होती?

सायनाने रविवारी (१३ जुलै) रात्री उशिरा इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून ही घोषणा केली होती. सायनाने पोस्टमध्ये म्हटले होते, "आयुष्य कधीकधी आपल्याला वेगळ्या दिशेने घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांतता, प्रगती आणि विरामाचा मार्ग निवडत आहोत." सायनाने कश्यपसोबत घालवलेल्या क्षणांबद्दल आनंद व्यक्त केला होता. सायनाने लिहिले होते, "या आठवणींसाठी मी नेहमीच कृतज्ञ आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. अशा वेळी आमच्या वैयक्तिक आयुष्यातील गोपनीयता समजून घेतल्याबद्दल आणि त्याचा आदर केल्याबद्दल सर्वांचे आभार."

२०१८ मध्ये प्रेमविवाह

सायना आणि पारूपल्ली कश्यप यांचे ७ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांनीही २०१८ मध्ये लग्नाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. कारण बराच काळ या दोन्ही स्टार्सनी त्यांचे नाते मीडिया आणि चाहत्यांच्या नजरेपासून दूर ठेवले होते. असे म्हटले जाते की त्यांच्या नात्याची सुरुवात त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात झाली होती. दोघांची भेट हैदराबादमधील दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीत झाली होती. तिथेच ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालDivorceघटस्फोटParupalli Kashyapपारुपल्ली कश्यपSocial Mediaसोशल मीडियाBadmintonBadminton