शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सायना फायनलमध्ये

By admin | Updated: January 25, 2015 02:00 IST

गत चॅम्पियन आणि स्पर्धेत अव्वल मानांकन प्राप्त भारताच्या सायना नेहवालने आपला विजयी धडाका कायम राखताना सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला़

लखनौ : गत चॅम्पियन आणि स्पर्धेत अव्वल मानांकन प्राप्त भारताच्या सायना नेहवालने आपला विजयी धडाका कायम राखताना सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला़ पुरुष गटातील अंतिम फेरीत भारताचा के़ श्रीकांत आणि पी़ कश्यप अजिंक्यपदासाठी एकमेकांशी झुंजतील़महिला एकेरी गटात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालने स्पर्धेतील कामगिरीत सातत्य राखताना उपांत्य फेरीच्या लढतीत तृतीय मानांकित थायलंडच्या निचोन जिंदापोन हिच्यावर अवघ्या ४० मिनिटांत २१-१०, २१-१६ असा विजय मिळवून थाटात फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केला़ पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत अव्वल मानांकन प्राप्त श्रीकांतने आपल्याच देशाच्या चौथ्या मानांकनप्राप्त एचएस प्रणयला ६२ मिनिटांत १२-२१, २१-१२, २१-१४ अशा फरकाने धूळ चारून फायनल गाठली़ अन्य सेमीफायनलमध्ये तृतीय मानांकनप्राप्त पी़ कश्यप याने द्वितीय मानांकनप्राप्त डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसनवर १ तास आणि ५ मिनिटांत १८-२१, २२-२०, २१-७ अशी मात करून अंतिम फेरी गाठली़ आता कश्यम आणि श्रीकांत ही जोडी फायनलमध्ये जेतेपदासाठी आमनेसामने येईल.दरम्यान, पुरुष दुहेरीत गटातील उपांत्य लढतीत पाचवे मानांकनप्राप्त मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी या भारतीय जोडीने चौथे मानांकनप्राप्त रशियाच्या व्लादिमीर इव्हानोव्ह आणि इवान सोजोनोव्हवर केवळ ३० मिनिटांत २१-१२ आणि २१-१८ अशा फरकाने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला़ (वृत्तसंस्था)या लढतीत सायनाने दुसऱ्या गेममध्ये ८-१० ने पिछाडीवर पडल्यानंतर सलग ६ गुणांची कमाई करताना १४-१० अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर सहज हा गेम नावे करून सलग दुसऱ्यांदा स्पर्धेची फायनल गाठली़