Russia-Ukraine War: दुर्दैवी अंत! रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या दोन युवा फुटबॉलपटूंनी गमावले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 22:02 IST2022-03-03T22:00:45+5:302022-03-03T22:02:36+5:30
मरण पावलेला एक फुटबॉलपटू अवघ्या २१ वर्षांचा होता.

Russia-Ukraine War: दुर्दैवी अंत! रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या दोन युवा फुटबॉलपटूंनी गमावले प्राण
Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याच्या घटनेला आता एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. दोन देशांमधील लढाई सुरूच असून दोन्ही बाजूंचे शेकडो सैनिक मरण पावले आहेत. अनेक निष्पाप युक्रेनियन नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. रशियन हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झालेल्या युक्रेनमधून आता आणखी एक दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या दोन प्रोफेशनल फुटबॉलपटूंचा मृत्यू झाला आहे.
Our thoughts are with the families, friends, and teammates of young Ukrainian footballers Vitalii Sapylo (21) and Dmytro Martynenko (25), football’s first reported losses in this war.
— FIFPRO (@FIFPRO) March 1, 2022
May they both rest in peace. pic.twitter.com/f6l9oHHRMr
मिळालेल्या माहितीनुसार, फिफ्प्रो या व्यावसायिक फुटबॉलपटूंच्या जागतिक संघटनेने गुरुवारी (३ मार्च) एक निवेदन प्रसिद्ध केलं. त्यात या दु:खद घटनेची माहिती देण्यात आली. त्यांच्या निवेदनात नमूद केल्यानुसार, रशियाच्या हल्ल्यात विटाली सपिलो (२१) आणि दिमित्रो मार्टिनेन्को (२५) यांना आपला जीव गमवावा लागला आहे. रशिया-युक्रेन युद्धातील फुटबॉलपटूंच्या मृत्यूची ही पहिली घटना आहे.