शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्डकपसाठी सचिन तेंडुलकर ब्रँड अ‍ॅम्बॅसडर

By admin | Updated: December 23, 2014 02:05 IST

भारताचा वरिष्ठ माजी फलंदाज आणि वन-डे वर्ल्डकपमध्ये सर्वांत जास्त धावा बनविणाऱ्या सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढील

मुंबई : भारताचा वरिष्ठ माजी फलंदाज आणि वन-डे वर्ल्डकपमध्ये सर्वांत जास्त धावा बनविणाऱ्या सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढील वर्षी होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपसाठी ब्रँड अ‍ॅम्बॅसडर म्हणून नियुक्ती केली आहे़ सलग दुसऱ्यांदा या महान खेळाडूकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ यापूर्वी भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांत २०११ मध्ये झालेल्या वर्ल्डकपसाठी सचिनची ब्रँड अ‍ॅम्बॅसडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती़ सचिन आता पुढील वर्षी १४ फेब्रुवारी ते २९ मार्च दरम्यान होणाऱ्या वर्ल्डकपसाठी आयसीसीच्या विविध कार्यक्रमांत सहभाग घेऊन या खेळाच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी पार पाडणार आहे़सचिनने गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे़ त्याने २४ वर्षांच्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीत २०० कसोटी आणि ४६३ वन-डे सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे़ या ४१ वर्षीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४,३५७ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर तब्बल शंभर शतके जमा आहेत़ विशेष म्हणजे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे़ त्याने वर्ल्डकपमधील ४५ सामन्यांत ५६़९५ च्या सरासरीने २,२७८ धावा बनविल्या आहेत़ वर्ल्डकपसाठी ब्रँड अ‍ॅम्बॅसडर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सचिन म्हणाला, गत सहा वर्ल्डकपमध्ये मी एक खेळाडू म्हणून सहभाग घेत होतो़ मात्र, आता यावेळी २०१५ च्या वर्ल्डकपसाठी ब्रँड अ‍ॅम्बॅसडरची भूमिका निभावणे माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव असेल़ कारण प्रत्यक्ष मैदानावर नव्हे, तर मैदानाबाहेर राहून मी ही जबाबदारी पार पाडणार आहे़ सचिन तेंडुलकरने १९८७ च्या वर्ल्डकपच्या आठवणींना उजाळा दिला़ तो म्हणाला, या वर्ल्डकपमध्ये मी मैदानावर बॉलबॉयची भूमिका पार पाडली होती़ त्यावेळी खेळाडूने टोलवलेल्या प्रत्येक चेंडूवर त्यांना चिअर करीत होतो़ दरम्यान, जसजसा वर्ल्डकप जवळ येत आहे, तसतसा या खेळाबद्दल क्रीडाप्रेमींचा उत्साह वाढत आहे़ भारतात झालेली मागील स्पर्धा यशस्वी झाली होती, त्याचप्रमाणे आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या या वर्ल्डकपचे यशस्वी आयोजन होईल, असेही तो म्हणाला़ (वृत्तसंस्था)