शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

श्रीसंत लागला सरावाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2015 01:49 IST

क्रिकेटविश्व ढवळून काढणाऱ्या २०१३ च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी न्यायालयाने निर्दोष सोडल्याने भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत याला

कोची : क्रिकेटविश्व ढवळून काढणाऱ्या २०१३ च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी न्यायालयाने निर्दोष सोडल्याने भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत याला आता भारतीय संघात पुनरागमन करण्याचे वेध लागले आहेत. त्या दृष्टीने त्याने रविवारपासून सरावास सुरुवात केली आहे. राजस्थान रॉयल्सचा खेळाडू श्रीसंत, अजीत चंडीला आणि अंकित चव्हाण या तिघांना दिल्लीच्या न्यायालयाने सबळपुराव्यांअभावी निर्दोष ठरविले होते. या तिघांना मे २०१३ मध्ये अटक झाली होती. त्यांची पुढे तिहार कारागृहात रवानगी करण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांत बराच त्रास हसन करणाऱ्या श्रीसंतने पहिलाच नेटसराव केला. यावेळी मित्र आणि चाहते त्याच्यासमवेत होते. पांढरा ट्रॅकसूट परिधान केलेल्या श्रीसंतने एडापल्ली हायस्कूल मैदानावर नेटसराव केला. आरोपमुक्त झाल्याने प्रसन्न मुद्रेत असलेल्या या खेळाडूचा जवळपास दोन वर्षानंतरचा हा पहिलाच सराव होता.सराव करण्याआधी पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला,‘ आजपासून तीन आठवड्यात मी सामन्यासाठी स्वत:ला सज्ज करेन.’श्रीसंतचे आपल्या घरी आगमन होताच चाहते आणि मित्रांनी त्याचे शानदार स्वागत केले. यावर श्रीसंत म्हणाला,‘ नेहमी माझ्या पाठिशी राहणाऱ्या कुटुंबियांचा , मित्रांचा आणि चाहत्यांचा आभारी आहे. माझा हा पुनर्जन्म आहे. यानंतर टेनिसबॉल क्रिकेटजरी खेळायचे झाल्यास मी त्यात उत्साहाने सहभागी होईन.’ बीसीसीआयने मात्र तिन्ही खेळाडूंवरील आजन्म बंदी कायम ठेवली आहे. पण श्रीसंतने बीसीसीआय बंदी मागे घेईल तसेच मी भारतीय संघांत पुनरागमन करू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान बीसीसीआय उपाध्यक्ष व केरळ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष टी. सी. मॅथ्यू म्हणाले,‘ आम्ही बोर्डाला पत्र लिहून श्रीसंतवरील बंदी मागे घेण्याची विनंती करू. (वृत्तसंस्था)