रो'हिट', भारत भारत ३ बाद २१४

By Admin | Updated: October 11, 2015 16:07 IST2015-10-11T12:55:52+5:302015-10-11T16:07:07+5:30

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीवीर रोहित शर्माच्या दमदार शतकाने भारताने सामन्यावरील पकड मजबूत केली असून भारताने ४० षटकात ३ गडी गमावत २१४ धावा केल्या आहेत.

Rohit ', India India 214 after 3 | रो'हिट', भारत भारत ३ बाद २१४

रो'हिट', भारत भारत ३ बाद २१४

ऑनलाइन लोकमत

कानपूर, दि. ११ - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीवीर रोहित शर्माच्या दमदार शतकाने भारताने सामन्यावरील पकड मजबूत केली असून भारताने ४० षटकात ३ गडी गमावत २१४ धावा केल्या आहेत. 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेला रविवारी सुरुवात झाली असून कानपूर येथे पहिला सामना सुरु आहे. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डिकॉक आणि हाशिम आमला ही जोडी संघाच्या ४५ धावा झाला असताना फुटली. डिकॉक २९ धावांवर बाद झाला. यांनतर आमलाने फाफू डू प्लेसिसच्या साथीने आफ्रिकेला शंभरी गाठून दिली. आमला ३७ धावांवर बाद झाला. प्लेसिस अर्धशतक ठोकून डिव्हिलियर्सच्या साथीने संघाचा डाव पुढे नेला. प्लेसिस ६२ धावांवर बाद झाल्यावर डेव्हिड मिलर आणि जेपी ड्यूमिनी हे दोघे स्वस्तात माघारी परतल्याने आफ्रिकेची अवस्था ४५.१ षटकांत ५ बाद २३८ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर डिव्हिलियर्सने फरहान बेहरदीनच्या साथीने भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. डिव्हिलिर्यसने शेवटच्या चेंडूवर षटकात ठोकून शतक ठोकले. तर बेहरदीनने १९ चेंडूंमध्ये नाबाद ३५ धावा केल्या. भारतातर्फे उमेश यादव व अमित मिश्राने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर आर अश्विनने एक विकेट घेतली. आफ्रिकेने ५० षटकात ५ गडी गमावत ३०३ धावा केल्या.

आफ्रिकेचे ३०४ धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताला रोहित शर्माने मजबूत स्थितीत आणले. सलामीवीर शिखर धवन  २३ धावांवर बाद झाल्यावर रोहित आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर जोडीने भारताला सामन्यात पकड मिळवून दिली. या जोडीने १४९ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने दमदार शतक झळकावले तर अजिंक्य रहाणेने ६० धावा केल्या. रहाणेनंतर विराट कोहली ११ धावांवर बाद झाला. सध्या खेळपट्टीवर रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी ही जोडी खेळत आहे.

Web Title: Rohit ', India India 214 after 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.