शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गज खेळाडूंची माघार

By admin | Updated: January 31, 2015 03:34 IST

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून अखेर शनिवारपासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेस प्रारंभ होत आहे़ या स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंनी काणाडोळा केला

बेनूर : (तिरुअनंतपुरम)- अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून अखेर शनिवारपासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेस प्रारंभ होत आहे़ या स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंनी काणाडोळा केला आहे; मात्र तरीही युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ही स्पर्धा चांगले व्यासपीठ आहे़ केरळमधील सात जिल्ह्यांत होत असलेल्या या स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी खूप उशीर झाला़ त्यामुळे ही स्पर्धा निर्धारित कार्यक्रमाच्या तब्बल तीन वर्षांनंतर आयोजित करण्यात येत आहे़ या स्पर्धेसाठी सचिन तेंडुलकरला सद्भावना दूत बनविण्यात आले; मात्र तरीही स्पर्धेसाठी पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही़ दरम्यान, बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल, आॅलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंह, मल्ल सुशीलकुमार, योगेश्वर दत्त यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे़ त्यामुळे स्पर्धेचे आकर्षण कमी झाले आहे़या वेळी स्पर्धेत एकूण १३६७ पदकांसाठी खेळाडू झुंजणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय क्रीडामंत्री सरबानंद सोनोवाल, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी अ‍ॅथलिट पी़ टी़ उषा आणि अंजू बॉबी जॉर्ज यांची उपस्थिती राहणार आहे़ (वृत्तसंस्था)