शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

रणजी : मुंबईची निराशाजनक सुरुवात

By admin | Updated: October 21, 2016 22:39 IST

रजत पाटीदारच्या शानदार शतकी खेळाच्या जोरावर रणजी चषकाच्या गु्रप ‘ए’मध्ये मध्य प्रदेश संघाने सर्वबाद ४४५ धावांचा डोंगर उभारला.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २१ : रजत पाटीदारच्या शानदार शतकी खेळाच्या जोरावर रणजी चषकाच्या गु्रप ‘ए’मध्ये मध्य प्रदेश संघाने सर्वबाद ४४५ धावांचा डोंगर उभारला. तर प्रत्युत्तरात मुंबई संघाची सुरुवात निराशाजनक झाली असून दुसऱ्या दिवस अखेर मुंबई संघाने २ गडी गमावत ३२ धावा केल्या आहेत.मध्य प्रदेश संघाने २ बाद २३९ धावांवरुन खेळण्यास सुरुवात केली. रजतने कर्णधार देवेंद्र बुंदेलाच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. रजतने चौफेर फटकेबाजी करत २४६ चेंडूत १५ चौकारांसह १०६ धावांची खेळी केली. नवव्या प्रथम श्रेणी सामन्यात रजतने चौथे शतक झळकावले. मोठी खेळी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या रजतला बलविंदर संधूने आदित्य तरेच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. रजत बाद झाल्यावर शुभम शर्मा (नाबाद ८३) आणि अंकित दाने (४७) ने सहाव्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. मध्य प्रदेशचे तळाचे पाच फलंदाज अवघ्या ४२ धावांत गुंडाळण्यात मुंबईच्या गोलंदाजांना यश आले. मुंबईच्या तुषार देशपांडे आणि विजय गोहिलने प्रत्येकी तीन गडी तंबूत धाडले. तर बलविंदर संधूने दोन गडी मिळवले.प्रत्युत्तरात मुंबईचा सलामीवीर कौस्तुभ पवार ६ धावांवर बाद झाला. तर बलविंदर संधू १ धाव करत तंबूत परतला. दिवसअखेर मुंबई संघाने २ बाद ३२ धावांवर केल्या असून अखिल हेरवाडकर (२९) आणि श्रेयस अय्यर (१) खेळत आहे. मुंबई संघ ४०७ धावांवर पिछाडीवर असून आठ फलंदाज शिल्लक आहेत