शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

राजीव शुक्ला पुन्हा आयपीएलवर

By admin | Updated: April 7, 2015 04:08 IST

राजीव शुक्ला यांची पुन्हा आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे महिनाभरापासून आयपीएल संचालन

नवी दिल्ली : राजीव शुक्ला यांची पुन्हा आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे महिनाभरापासून आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते असलेले शुक्ला २०१३ पर्यंत आयपीएलचे अध्यक्ष होते; पण आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. आयपीएलच्या अध्यक्षपदासाठी माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली, अजय शिर्के आणि रंजीब बिस्वाल यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत होती, पण अखेर शुक्ला यांच्या नावाला सर्वांची पसंती मिळाली. कोलकातामध्ये आयपीएलच्या आठव्या पर्वाच्या उद््घाटन कार्यक्रमाच्या एक दिवसापूर्वी शुक्ला यांची नियुक्ती झाली. भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांना तांत्रिक समितीच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले, तर काँग्रेसचे नेते व एमपीसीएचे प्रमुख ज्योतिरादित्य शिंदे वित्त समितीचे प्रमुख असतील. गोव्याचे चेतन देसाई विपणन समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणार असून, आंध्रचे गोकाराजू गंगराजू यांच्याकडे दौरा व कार्यक्रम समितीचे प्रभारीपद सोपवण्यात आले आहे. बंगाल क्रिकेट संघटनेचे कोषाध्यक्ष विश्वरूप डे मीडिया समितीचे नवे प्रमुख असतील. अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एफिलेशन समिती नावाची नवी समिती स्थापन करण्यात आली असून, बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया आता स्वत: संविधान समीक्षण समितीचे अध्यक्षपद सांभाळणार आहेत. शुक्ला त्यांना सहकार्य करतील. भ्रष्टाचारविरोधी व सुरक्षा समितीच्या (एसीएसयू) उपसमितीची निवड सध्या टाळण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)