शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ईडन गार्डनवर पावसाची सरशी

By admin | Updated: April 27, 2015 01:50 IST

आयपीएलच्या आठव्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान रविवारी ईडन गार्डनवर खेळला जाणारा २५ वा

कोलकाता : आयपीएलच्या आठव्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान रविवारी ईडन गार्डनवर खेळला जाणारा २५ वा सामना मुसळधार पावसामुळे रद्द करावा लागला. पावसाच्या व्यत्ययामुळे या लढतीत एकही चेंडू टाकला गेला नाही. ही लढत सायंकाळी ४ वाजता प्रारंभ होणार होती, पण त्यापूर्वीच कोलकातामध्ये मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे बाह्ण मैदान निसरडे झाले. सायंकाळी ७.२० वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा मैदानाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याची घोषणा केली. ही लढत रद्द झाल्यामुळे उभय संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला. राजस्थानच्या खात्यावर एकूण ११ गुणांची नोंद असून हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे तर सात गुणांसह कोलकाता नाईट रायडर्स संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी कायम आहे. पावसाला प्रारंभ झाल्यानंतर मैदानावरील कर्मचाऱ्यांनी पूर्ण मैदानावर कव्हर टाकले, पण मुसळधार पावसामुळे मैदानावर पाणी साचले व बाह्य मैदान निसरडे झाले. येथे शनिवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली होती, पण सामना प्रारंभ होण्यापूर्वी येथे पावसाचा जोर वाढला. त्यानंतर मैदान खेळण्यायोग्य करण्यासाठी दोन सुपर सोपर्सचा वापर करण्यात आला आणि अतिरिक्त पाणी काढण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यात यश आले नाही. कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीर डग आऊटमध्ये बसून परिस्थिती जाणून घेत होता. मैदानावरील कर्मचाऱ्यांची धावपळ बघितल्यानंतर काही षटकांचा सामना आयोजित होण्याची शक्यता वर्तवली जात होतीपावसानंतर एकवेळ सामना प्रत्येकी पाच षटकांचा खेळवल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. डेव्हिड लॉयड यांनी सांगितले की, ‘५.३० नंतर काही षटके कमी केल्या जारू शकतात.’ ५ वाजताच्या सुमारास पाऊस थांबल्यानंतर मैदानावरील कव्हर काढण्यास सुरुवात झाली, पण पुन्हा पावसाला सुरुवात झाली. पंचांनी खेळपट्टी व मैदानाची पाहणी केली. पंचांनी राजस्थानचे प्रशिक्षक पॅडी उप्टन यांच्यासोबत सामन्याच्या शक्यतेबाबत चर्चा केली. या व्यतिरिक्त गंभीरने केकेआरचे प्रशिक्षक ट्रॅव्हर बेलिस यांच्यासोबत चर्चा केली. प्रदीर्घ चर्चेनंतर व मैदानाची पाहणी केल्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याची घोषणा केली. केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर व राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉटसन यांनी एकमेकांसोबत हस्तांदोलन केले. एकही चेंडू न टाकताच सामना रद्द करण्यात आला. रद्द सामन्यानंतर उभय संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. आयपीएलमध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झालेला हा पहिलाच सामना आहे. (वृत्तसंस्था)