टेनिस स्टार राफेल नदालला कोरोनाची लागण; अबु धाबी येथील स्पर्धेत घेतला होता सहभाग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 16:41 IST2021-12-20T16:41:09+5:302021-12-20T16:41:30+5:30

टेनिस सुपरस्टार राफेल नदाल याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

Rafael Nadal says he tested positive for Covid-19 in Spain after playing in Abu Dhabi tennis event | टेनिस स्टार राफेल नदालला कोरोनाची लागण; अबु धाबी येथील स्पर्धेत घेतला होता सहभाग 

टेनिस स्टार राफेल नदालला कोरोनाची लागण; अबु धाबी येथील स्पर्धेत घेतला होता सहभाग 

टेनिस सुपरस्टार राफेल नदाल याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अबु धाबी येथील प्रदर्शनीय स्पर्धेत खेळून तो मायदेशी स्पेनमध्ये परतला आणि त्याला कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले आहे. नदालननं स्वतः सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. 

''अबु धाबी येथील स्पर्धेतून मायदेशात परतल्यानंतर माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्पेनमध्ये आल्यानंतर माझी PCR चाचणी झाली आणि त्यात कोरोना झाल्याचे समोर आले आहे. मला सध्याच्या घडीला बरं वाटत नाही, परंतु मी हळुहळू बरा होईल, अशी खात्री आहे. मी आता घरीच उपचार घेत आहे आणि माझ्या संपर्कात आलेल्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी मी त्यांना विनंती करतो,''असे त्यानं ट्विट केलं आहे.

Web Title: Rafael Nadal says he tested positive for Covid-19 in Spain after playing in Abu Dhabi tennis event