आर प्रज्ञाननंदाने जिंकले गोल्ड मेडल! पहिल्या जागतिक रॅपिड टीम चॅम्पियनशीपमध्ये टॉपर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 11:57 AM2023-08-29T11:57:09+5:302023-08-29T11:59:10+5:30

आर प्रज्ञाननंदा FIDE World Rapid Team Championship  स्पर्धेत सहभागी झाला अन् त्याने त्यात गोल्ड मेडल जिंकले.

R Praggnanandhaa won first FIDE World Rapid Team Championship 2023 | आर प्रज्ञाननंदाने जिंकले गोल्ड मेडल! पहिल्या जागतिक रॅपिड टीम चॅम्पियनशीपमध्ये टॉपर

R Praggnanandhaa won first FIDE World Rapid Team Championship 2023

googlenewsNext

काही दिवसांपूर्वी मॅग्नस कार्लसन याच्याकडून जागतिक बुद्धीबळ स्पर्धेच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर लगेचच आर प्रज्ञाननंदा FIDE World Rapid Team Championship  स्पर्धेत सहभागी झाला अन् त्याने त्यात गोल्ड मेडल जिंकले. WR Chess संघात प्रज्ञाननंदासह सो वेस्ली, अब्दुसातोरोव्ह नोडीर्बेक, नेपोमनिआचची इयान, डुडा जान-क्रझीतोफ, केयमेर व्हिन्सेंट, हो यिफान, कोस्तेनिक अलेक्झांड्रा या ग्रँडमास्टर्ससह रोसेन्स्टेन वादीम यांचा समावेश होता. या संघाने १२ पैकी १० सामने जिंकले अन् दोनमध्ये ड्रॉवर त्यांना समाधान मानावे लागले. या संघाने सर्वाधिक २२ गुणांची कमाई केली. टीम फ्रिडमला दुसऱ्या, तर भारतीय खेळाडूंचा समावेश असलेल्या टीम MGD1 ला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यांनी अनुक्रमे २० व १८ गुणांची कमाई केली. 

बुद्धिबळाच्या ६४ घरांत भारताचे उज्ज्वल भविष्य! अर्जुन पुरस्कार विजेते प्रविण ठिपसे यांचा खास लेख

WR Chess संघाने ११व्या फेरीत विजय मिळवून जेतेपद पक्के केले, त्याच फेरीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या फ्रिडमला ड्रॉ वर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला चषक, पदक आणि १ लाख युरो ( जवळपास ९० लाख रुपये) असे पारितोषिक देण्यात आले. टीम फ्रिडमला ५४ लाख, तर MGD1 ला ३६ लाख बक्षीस रक्कम मिळाली.  MGD1संघात भारताच्या हरिकृष्णा, निहाल, एरिगैसी, साधवानी, आदित्य, श्रीनाथ, हरिका या खेळाडूंचा समावेश होता.  


काही दिवसांपूर्वी झालेल्या जागतिक स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रज्ञाननंदाला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. १८ वर्षीय भारतीय खेळाडूला वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नेस कार्लसनने टाय ब्रेकर लढतीत १.५ - ०.५ असे पराभूत केले होते. 

Web Title: R Praggnanandhaa won first FIDE World Rapid Team Championship 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.