शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला धक्का

By admin | Updated: January 13, 2016 03:53 IST

आंध्र प्रदेशने उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर यजमान महाराष्ट्रला द ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशनच्या (बीडब्लूओ) वतीने आयोजित राष्ट्रीय अंध क्रिकेट स्पर्धेत पराभवाचा धक्का दिला.

मुंबई : आंध्र प्रदेशने उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर यजमान महाराष्ट्रला द ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशनच्या (बीडब्लूओ) वतीने आयोजित राष्ट्रीय अंध क्रिकेट स्पर्धेत पराभवाचा धक्का दिला. तर दुसऱ्या बाजूला राजस्थानने मध्य प्रदेशवर ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. मरिन लाइन्स येथील इस्लाम जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या ‘अ’ गटात नाणेफेक जिंकून आंध्र प्रदेशने यजमान संघाला प्रथम फलंदाजी दिली. महाराष्ट्राच्या नीलेश-अनिशने पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांचा समाचार घेताना तीन षटकात ४० धावांची वेगवान भागीदारी केली. यष्टिरक्षकाच्या मागील चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना नीलेश धावचीत झाला. त्यानंतर कर्णधार प्रशांतने धावफलक हलता ठेवला. प्रशांत ऐन रंगात असताना दुसऱ्या बाजूने गडी बाद होत राहिले. सामन्यात तब्बल ७ गडी धावचीत झाले. प्रशांतच्या २३ चेंडूतील ३० धावांच्या जोरावर महाराष्ट्रने १२ षटकांत ८ बाद १३० धावांची आव्हानात्मक मजल मारली. प्रत्युत्तरात आंध्रच्या सलामीवीरांनीही तोडीस तोड फलंदाजी केली. आर. रवी याने ३० चेंडूत अर्धशतक झळकावले. महाराष्ट्राच्या सुमार क्षेत्ररक्षणाचा फायदा आंध्रच्या फलंदाजांनी घेतला. प्रशांतने ३ षटाकांत दोन गडी मिळवले. दरम्यान, अखेरीस अचूक गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला. सहा चेंडू सहा धावांची आवश्यकता असताना तीन चेंडूतच आंध्रने विजय निश्चित केला. महाराष्ट्राने सामन्यात तब्बल २६ धावा अतिरिक्त दिल्या. दुसऱ्या बाजूला राजस्थानने मध्य प्रदेशचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मध्य प्रदेशच्या अंगलट आला. पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूत प्रल्हाद त्रिफळाचीत झाला. सुरेशच्या २८ धावांच्या मदतीने मध्य प्रदेशने निर्धारित षटकात १०२ धावांचे माफक लक्ष्य राजस्थान समोर ठेवले. प्रत्युत्तरात राजस्थानने एका फलंदाजाच्या मोबदल्यात ७.५ षटकात ते पार केले. बिक्रमने २३ चेंडूत नाबाद ५२ धावांची तुफानी खेळी केली. प्रशांतने ३० धावा करीत त्याला योग्य साथ दिली.