शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

CWG 2022:पदक विजेत्या पंजाबमधील खेळाडूंना सरकारकडून बक्षीस जाहीर, भगवंत मान यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 17:40 IST

बर्गिंहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली सोनेरी कामगिरी दाखवली आहे.  

नवी दिल्ली : बर्गिंहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (CWG 2022) भारतीय खेळाडूंनी आपली सोनेरी कामगिरी दाखवली आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत एकूण १४ पदकांची नोंद झाली आहे. १४ मधील ९ पदक वेटलिफ्टिंगमधून मिळाली असून यामध्ये पाच सुवर्ण पदकांचा समावेश आहे. दरम्यान, वेटलिफ्टिंगमध्ये ७१ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावणाऱ्या हरजिंदर कौरला पंजाब सरकार ४० लाख रूपयांचे बक्षीस देणार आहे. नायजेरियाकडून सुवर्णपदकाची दावेदार असलेली जॉय इजे क्लीन ंड जर्कच्या तीनही प्रयत्नांमध्ये अपयशी ठरल्याने हरजिंदरचे कांस्यपदक निश्चित झाले. 

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि क्रीडा मंत्री गुरमीत सिंग मीत यांनी हरजिंदरचे कौतुक केले. तसेच पंजाब सरकारने तिला ४० लाख रूपयांच्या बक्षीसाची घोषणा देखील केली. "नाभाची रहिवाशी असलेल्या हरजिंदर कौरला पंजाब सरकारच्या क्रीडा विभागाकडून ४० लाख रूपयांचे बक्षीस दिले जाईल. हरजिंदर सिंगने मिळवलेले हे यश भविष्यातील खेळाडूंसाठी एक प्रेरणा आहे", असे ट्विट मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केले आहे.

विकास ठाकूरला देणार ५० लाखराष्ट्रकुल स्पर्धेत पुरूषांच्या ९६ किलो वेटलिफ्टिंग गटात पंजाबच्या विकास ठाकूरने भारताला रौप्य पदक मिळवून दिले आहे. त्याला देखील पंजाब सरकार ५० लाख रूपयांचे बक्षीस देणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी ट्विटद्वारे सांगितले. "लुधियानातील रहिवाशी असलेल्या विकास ठाकूरने भारतासाठी रौप्य पदक पटकावले आहे. आमचे सरकार पंजाब मधील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे मदत करण्यासाठी पूर्णपणे कटीबद्ध आहे", अशा आशयाचे मुख्यंत्र्यांनी ट्विट केले. 

हरजिंदर कौरचा भाऊ प्रितपाल सिंगने म्हटले, "हा आमच्यासाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. तिने खूप मेहनत घेतली होती त्यामुळेच कांस्य पदक मिळाले आहे. आम्हाला पूर्ण विश्वास होता की ती नक्कीच पदक जिंकेल."  

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाWeightliftingवेटलिफ्टिंगIndiaभारतPunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मानTwitterट्विटर