शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पुन्हा हरले...

By admin | Updated: April 30, 2016 05:41 IST

गुजरात लायन्सने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघावर ३ गडी राखून विजय मिळविला.

विशाल शिर्के,

पुणे- अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात गुजरात लायन्सने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघावर ३ गडी राखून विजय मिळविला. अखेरच्या क्षणी एका चेंडूत १ धाव हवी असताना जेम्स फॉकनरने चेंडू टोलवून एक धाव घेतली व संघाला विजय मिळवून देत स्वत:लाच वाढदिवसाची अनोखी भेट दिली. या सामन्यात लक्षात राहिली ती पुणे संघाच्या स्टीव्ह स्मिथची शतकी खेळी व गुजरात लायन्सच्या ड्वेन स्मिथची दमदार अर्धशतकी खेळी. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना झाला. गुजरात लायन्स संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने विजयासाठी दिलेल्या १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ड्वेन स्मिथ व ब्रँडन मॅक्युलम या सलामीच्या जोडीने संघाच्या विजयाचा पाया रचला. मॅक्युलमने अवघ्या २२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकार खेचून ४३ धावांची खेळी केली. रजत भाटियाने अ‍ॅल्बी मॉर्कलकरवी मॅक्युलमला झेलबाद करून ही जोडी फोडली. ड्वेन स्मिथने ३७ चेंडूंत ९ चौकार व एका षटकाराच्या साह्याने ६३ धावांची खेळी केली. स्मिथला थिसारा परेराने त्रिफळाबाद करून गुजरातला दुसरा झटका दिला. त्या वेळी गुजरातच्या ६५ चेंडूंत ११५ धावा झाल्या होत्या. त्यानंतर सुरेश रैना व दिनेश कार्तिक यांनी तिसऱ्या गड्यासाठी ३३ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. कार्तिकने ४ चौकारांच्या साह्याने २० चेंडूंत ३३ धावा फटकावल्या. अशोक डिंडाचा चेंडू फटकावण्याच्या प्रयत्नात कार्तिक रहाणेकडे झेल देऊन परतला. त्यानंतर डिंडाच्याच १९व्या षटकांत ड्वेन ब्राव्हो (७) धोनीकडे झेल देऊन परतला. पाठोपाठच्या चेंडूवर रवींद्र जडेजाला (०) धोनीने धावबाद केल्याने गुजरातची अवस्था ५ बाद १८० झाली. थिसारा परेराच्या अखेरच्या षटकात ६ चेंडूंत ९ धावा हव्या होत्या. फॉकनरने चौकार मारून अंतर कमी केले. त्यानंतर रैनाला (२८ चेंडूंत ३४) परेराने त्रिफळाबाद करून चुरस निर्माण केली. पाठोपाठच्या चेंडूवर ईशान किशन धावबाद झाला. अखेर २ चेंडूंत ३ धावा हव्या होत्या. त्यावर फॉकनरने २ धावा घेतल्याने एका चेंडूत १ धाव, अशी स्थिती झाली. अखेरच्या चेंडूवर फॉकनरने धाव घेऊन संघाला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, शिवल कौशिकच्या दहाव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर स्मिथचा त्रिफळा उडाला; मात्र नो बॉल असल्याने त्याला जीवदान मिळाले. या ४१ धावांवर मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवून स्मिथने ५४ चेंडूंत १०१ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. अजिंक्य रहाणे (४५ चेंडूंत ५३), महेंद्रसिंह धोनी (१८ चेंडूंत नाबाद ३०) यांच्या खेळीने पुणे संघाने २० षटकांत ३ बाद १९५ धावा केल्या. >धावफलक : रायझिंग पुणे सुपरजायंट्स : २० षटकांत ३ बाद १९५, अजिंक्य रहाणे धावबाद (ब्राव्हो) ५३, सौरभ तिवारी १ धावबाद (सुरेश रैना), स्टीव्हन स्मिथ १०१ त्रि. गो. ब्राव्हो, महेंद्रसिंह धोनी नाबाद ३०, थिसारा परेरा नाबाद ३, ड्वेन ब्राव्हो १-४०, प्रवीणकुमार ०-३७, रवींद्र जडेजा ०-३७ पराभूत वि. गुजरात लायन्स : २० षटकांत ७ बाद १९६, ड्वेन स्मिथ त्रि. गो. परेरा ६३, ब्रँडन मॅक्युलम ४३ झे. मॉर्कल गो. भाटिया, सुरेश रैना ३४ त्रि. गो. परेरा, दिनेश कार्तिक ३३ झे. रहाणे गो. डिंडा, जेम्स फॉकनर नाबाद ९, अवांतर ७, गोलंदाजी : अशोक डिंडा २-४०, थिसारा परेरा २-४१, रजत भाटिया १-२६.