विजेंदरला सहज नमवेल व्यावसायिक बॉक्सिंग - अर्नेस्ट अमुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:54 AM2017-12-16T00:54:48+5:302017-12-16T00:54:57+5:30

२३ डिसेंबरला जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये विजेंदरशी दोन हात करू तेव्हा भारताच्या या स्टार बॉक्सरला सहज पराभूत करू, असे आफ्रिकन चॅम्पियन घानाच्या अर्नेस्ट अमुजू याने म्हटले आहे.

Professional Boxing - Earnest Amju | विजेंदरला सहज नमवेल व्यावसायिक बॉक्सिंग - अर्नेस्ट अमुजू

विजेंदरला सहज नमवेल व्यावसायिक बॉक्सिंग - अर्नेस्ट अमुजू

googlenewsNext

नवी दिल्ली : २३ डिसेंबरला जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये विजेंदरशी दोन हात करू तेव्हा भारताच्या या स्टार बॉक्सरला सहज पराभूत करू, असे आफ्रिकन चॅम्पियन घानाच्या अर्नेस्ट अमुजू याने म्हटले आहे.
आतापर्यंत विजेंदरने ९ लढती खेळल्या आहेत आणि त्या सर्वच लढतीत तो जिंकला आहे. त्याने डब्ल्यूबीओ आशिया पॅसेफिक आणि ओरिएंटल सुपर मिडलवेटचे विजेतेपद पटकावले आहे. अमुजू याने आतापर्यंत २५ लढती खेळल्या आहेत आणि त्यापैकी त्याने २३ मध्ये विजय नोंदवला आहे. यातील २१ नॉकआऊट आहेत. विजेंदरशी दोन हात करण्यासाठी तो कठोर मेहनत करीत आहे.
तो म्हणाला, ‘मी या लढतीसाठी प्रत्येक दिवशी आठ तासांपर्यंत कठोर मेहनत घेत आहे. या लढतीच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. विजेंदर आणि तो रिंगवर जे काही करेल त्यासाठी मी पूर्णपणे सज्ज आहे. मी आतापर्यंत त्याचे नाव ऐकले आहे; परंतु त्याला कधी खेळताना पाहिले नाही. मला विजेंदरला पहिल्यांदाच पराभव करण्यात आनंद वाटेल. मी त्याला त्यांच्याच प्रेक्षकासमोर पराभूत करीन. मी त्याच्या शरीरावर प्रहार करेल आणि उजव्या हाताने जोरदार ठोशा मारून त्याला नॉकआऊट करीन.’ (वृत्तसंस्था)

- व्यावसायिक सर्किटवरील अनुभव विजेंदरविरुद्ध कामी येईल, असे अर्नेस्ट अमुजू याने यावेळी सांगितले. अमुजू पुढे म्हणाला की, ‘मी विजेंदर सिंगच्या तुलनेत व्यावसायिक सर्किटवर खूप अनुभवी फायटर आहे. मी अनेक खडत सामने खेळलो आहे,’ त्याचप्रमाणे, ‘आतापर्यंत विजेंदरने कोणत्याही अनुभवी आणि दमदार मुष्टियोद्ध्याचा सामना केलेला नाही. त्यामुळेच त्याला व्यावसायिक मुष्टियोद्ध्याविरुद्ध लढण्याचा अनुभव कसा असतो, हे जयपूरमध्ये समजेल,’ असेही अमुजूने यावेळी म्हटले.

Web Title: Professional Boxing - Earnest Amju

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा