प्रो कबड्डी : तेलगु टायटन्सवर मात करत यू मुंबाची विजयी सलामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 20:53 IST2019-07-20T20:53:02+5:302019-07-20T20:53:29+5:30
पहिल्या सत्रात टायटन्सच्या संघाने धडाकेबाज कामगिरी करत यू मुंबावर १७-१० अशी आघाडी घेतली होती.

प्रो कबड्डी : तेलगु टायटन्सवर मात करत यू मुंबाची विजयी सलामी
हैदराबाद : प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामाची दमदार सुरुवात यू मुंबाने केली. पहिल्याच सामन्यात यू मुंबाने तेलुगू टायटन्सवर ३१-२५ असा पराभव करत विजयी सलामी दिली.
Tough ➡ Tougher ➡ Winning on the #WorldsToughestDay! 🔥@U_Mumba begin their #VIVOProKabaddi Season 7 campaign beating @Telugu_Titans 31-25!
— ProKabaddi (@ProKabaddi) July 20, 2019
Keep watching Star Sports for more LIVE action. #IsseToughKuchNahi#HYDvMUM
पहिल्या सत्रात टायटन्सच्या संघाने धडाकेबाज कामगिरी करत यू मुंबावर १७-१० अशी आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सत्रात मात्र त्यांच्या हातून सामना निसटला. यू मुंबा आणि टायटन्स या दोघांनीही बचावामध्ये प्रत्येकी दहा गुण कमावले. पण चढाईमध्ये मात्र यू मुंबाचा संघ एका गुणाने वरचढ ठरला. टायटन्सने चढाईमध्ये १५ आणि यू मुंबाने १६ गुणांची कमाई केली. पण यू मुंबाने टायटन्सवर लोण चढवत चार गुणांची कमाई केली आणि बोनसचा एक गुण मिळवत त्यांनी बाजी मारली.