प्रो कबड्डी : पाटणावर विजय मिळवत मुंबई प्लेऑफमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 21:51 IST2019-10-02T21:50:51+5:302019-10-02T21:51:34+5:30

या सामन्यातील पहिला गुण मुंबाने मिळवला. पण पहिला गुण मिळवण्यासाठी पाटणाला तब्बल चार मिनिटे वाट पाहायला लागली.

Pro Kabaddi: U Mumbai enter playoffs after winning over Patna Pirates | प्रो कबड्डी : पाटणावर विजय मिळवत मुंबई प्लेऑफमध्ये दाखल

प्रो कबड्डी : पाटणावर विजय मिळवत मुंबई प्लेऑफमध्ये दाखल

प्रो कबड्डी लीग : यू मुंबानेपाटणा पायरेट्सवर विजय मिळवत प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मुंबाने पाटणावर 30-26 असा विजय मिळवला आणि बाद फरीत दिमाखात प्रवेश केला.

या सामन्यातील पहिला गुण मुंबाने मिळवला. पण पहिला गुण मिळवण्यासाठी पाटणाला तब्बल चार मिनिटे वाट पाहायला लागली. पाटणाची सुरुवात फारच निराशाजनक झाली. कारण पाटण्याच्या संघावर आठव्याच मिनिटाला पहिला लोण चढल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या सत्रामध्ये पाटण्याच्या संघाने जोरदार पुनरागमन केले, पण तरीही त्यांना सामना चार गुणांनी गमवावा लागला.

Image

मुंबा आणि पाटणा या दोन्ही संघांनी पकडींमध्ये प्रत्येकी सात असे समान गुण मिळवले. पण पाटणाचा संघ यावेळी चढायांमध्ये मागे पडला. मुंबाच्या संघाने चढायांमध्ये 17 तर पाटणाने 15 गुण मिळवले. मुंबाने पाटणाला एकदा ऑलआऊट केले, त्यामुळे त्यांना दोन गुण मिळाले. पण पाटणाला मुंबाला एकदाही ऑलआऊट करता आले नाही आणि त्यांना चार गुणांनी सामना गमवावा लागला.

Web Title: Pro Kabaddi: U Mumbai enter playoffs after winning over Patna Pirates