प्रो कबड्डी : मुंबई आणि पुण्यामध्ये 33चा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 21:50 IST2019-09-05T21:46:14+5:302019-09-05T21:50:06+5:30

खोलवर चढाया करत मुंबईच्या संघाने 18 गुणांची कमाई केली.

Pro Kabaddi: U Mumba and Puneri Paltan match tied | प्रो कबड्डी : मुंबई आणि पुण्यामध्ये 33चा आकडा

प्रो कबड्डी : मुंबई आणि पुण्यामध्ये 33चा आकडा

नवी दिल्ली, प्रो कबड्डी : प्रो कबड्डीमध्ये यु मुंबा आणि पुणेरी पलटण यांच्यामध्ये 32चा आकडा असल्याचे सर्वश्रूत आहेच. पण आज झालेल्य सामन्यात मात्र या 33चा आकडा पाहायला मिळाला. आज मुंबई आणि पुण्याचा सामना चांगलाच थरारक झाला. अखेरच्या क्षणापर्यंत कोणता संघ जिंकेल, हे सांगणे कठीण होते. पण अखेर दोन्हीपैकी कोणताच संघ जिंकला नाही. कारण मुंबई आणि पुण्यातील सामना 33-33 या समान गुणांवर बरोबरीत सुटला.

पुण्यापेक्षा मुंबईच्या संघाने यावेळी चढायांमध्ये जास्त गुण कामावले. खोलवर चढाया करत मुंबईच्या संघाने 18 गुणांची कमाई केली. पुण्याच्या संघाला मात्र चढायांमध्ये 12 गुण मिळवता आले. दोन्ही संघांनी चांगला बचाव आणि पकडी केल्याचे पाहायला मिळाले. कारण पकडींमध्ये पुण्याने 12 तर मुंबईने 11 गुण पटकावले. मुंबईने यावेळी पुण्याचा संघ एकदा बाद करत दोन गुणांची कमाई केली. पण पुण्याने मुंबईवर दोन लोण चढवत चार गुण पटकावले.

Web Title: Pro Kabaddi: U Mumba and Puneri Paltan match tied