शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

Pro Kabaddi League 2021-22 Day 2: आजच्या तीन पंग्यात कोण कोणावर पडेल भारी.. पाहा इतिहास काय सांगतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 3:14 PM

आजच्या दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्ली विरूद्ध खेळणाऱ्या पुणेरी पलटणच्या कामगिरीकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे.

Pro Kabaddi League 2021-22 Day 2 Preview: कोरोनाच्या व्यत्ययानंतर अखेर प्रो कबड्डीचा नवा हंगाम काल सुरू झाला. यू मुंबा आणि गतविजेते बंगाल वॉरियर्स यांनी विजयी सलामी दिली. तर तमिळ थलायवाज आणि तेलुगू टायटन्समधील सामना बरोबरीत सुटला. आजदेखील स्पर्धेत तीन सामने रंगणार आहेत. पहिल्या सामना गुजरात विरूद्ध जयपूरचा असेल. त्यानंतर पुणेरी पलटण दिल्लीच्या दबंग संघासमोर उभी ठाकेल. आणि तिसऱ्या सामन्यात हरयाणा आणि पटणा हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. पाहूया या दोन संघांचा एकमेकांविरूद्धचा इतिहास...

गुजरात जायंट्स विरूद्ध जयपूर पिंक पॅँथर्स - हे दोन संघ एकमेकांसमोर संध्याकाळी ७.३० वाजता मैदानात उतरणार आहेत. गुजरात आणि जयपूर एकमेकांसमोर आतापर्यंत आठ वेळा आले असून त्यात गुजरातचं पारडं जड आहे. गुजरातने तब्बल पाच वेळा बाजी मारली आहे तर जयपूरला केवळ दोन वेळा विजय मिळवता आला आहे. एकदा त्यांच्यातील सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे जयपूरच्या संघाला जर आज विजयी सुरूवात करायची असेल तर त्यांना स्पर्धेचा इतिहास विसरून गुजरात जायंट्सविरूद्ध दमदार चढाई करणं आवश्यक आहे.

दबंग दिल्ली विरूद्ध पुणेरी पलटण - प्रो कबड्डीच्या इतिहासात पुणेरी पलटण दिल्लीच्या संघासमोर तब्बल १६ वेळा मैदानात उतरली आहे. या दोन संघांमध्ये नेहमीच काँटे की टक्कर पाहायला मिळते. १६ पैकी आठ वेळा पुणेरी पलटणने तर सात वेळा दबंग दिल्लीने सामन्यात बाजी मारली आहे. तर एक सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात दिल्ली पुण्याची बरोबरी करणार की पुणेरी पलटण पुन्हा एकदा बाजी मारणार याकडेच साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

हरयाणा स्टीलर्स विरूद्ध पटणा पायरेट्स - या दोन संघांमध्ये प्रो कबड्डी स्पर्धेत फारसे सामने झालेले नाहीत. हे दोन संघ केवळ पाच वेळा एकमेकांसमोर आले आहेत. त्यातही तीन वेळा हरयाणाने तर एकदा पटणा संघाने विजय मिळवला होता. एक सामना दोन्ही संघांनी बरोबरीत सोडवला होता. त्यामुळे आजच्या तिसऱ्या सामन्यात नक्की कोणता संघ कोणावर भारी पडणार यावर साऱ्यांचीच नजर असेल.

आजचे सामने-

गुजरात जायंट्स विरूद्ध जयपूर पिंक पँथर्स - संध्याकाळी ७.३० वाजतादबंग दिल्ली विरूद्ध पुणेरी पलटण - रात्री ८.३० वाजताहरयाणा स्टीलर्स विरूद्ध पटणा पायरेट्स - रात्री ९.३० वाजता

टॅग्स :Pro Kabaddi Leagueप्रो कबड्डी लीगPro-Kabaddiप्रो-कबड्डीPuneri Paltanपुनेरी पल्टन