शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Pro Kabaddi League 2021-22: दीड मिनिटांत ग्रह फिरले अन् गुजरातवर हरयाणा भारी पडले; पुण्यानं आघाडी घेऊनही बंगळुरूकडून मानली हार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 21:42 IST

Pro Kabaddi League 2021-22: प्रो कबड्डी लीगच्या आजच्या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध हरयाणा स्टीलर्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला.

Pro Kabaddi League 2021-22: प्रो कबड्डी लीगच्या आजच्या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध हरयाणा स्टीलर्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला. पहिल्या हाफमध्ये बरेच पिछाडीवर असलेल्या गुजरानं जबरदस्त पुनरागमन करताना सामना ३५-३५ असा बरोबरीत आणला. पण, अखेरच्या दीड मिनिटांत त्यांचे ग्रह फिरले अन् हरयाणानं २ गुणांनी बाजी मारली. दुसऱ्या सामन्यात बंगळुरू बुल्सनं ४०-२९ अशा फरकानं पुणेरी पलटनचे आव्हान सहज परतवून लावले. 

गुजरात जायंट्स पहिल्या सत्रात १०-२२ असे पिछाडीवर होते, परंतु दुसऱ्या सत्रात त्यांना हरयाणा स्टीलर्सला बॅकफूटवर फेकले. अटीतटीच्या या सामन्यात अखेरच्या दीड मिनिटांत हरयाणानं बाजी मारली. हरयाणाच्या विकास कंडोलानं पुन्हा एकदा सुपर १० पॉईंट्स घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला. एचएस राकेशच्या सुपर १०च्या जोरावर गुजरातनं सामन्यात कमबॅक केले खरे, परंतु अखेरच्या दीड मिनिटांतील चुका त्यांना महागात पडल्या अन् हरयाणानं ३८-३६ अशा फरकानं हा सामना जिंकला. गुजरातच्या राकेशनं २५ वेळा चढाई करताना १९ गुण आणले. हरयाणाच्या मितूनं १० गुणांची कमाई केली.   आजच्या दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटनचा पराभव झाला. बंगळुरू बुल्स विरूद्धच्या सामन्यात पहिल्या हाफमध्ये पुणेरी पलटनकडे १८-१५ अशी आघाडी होती. पण, दुसऱ्या हाफमध्ये बंगळुरूनं खेळ उंचावला. पवन शेरावत या सामन्यातला नायक ठरला. बंगळुरूनं हा सामना ४०-२९ असा जिंकला, त्यात पवनच्या ११ गुणांचा समावेश होता.  

टॅग्स :Pro Kabaddi Leagueप्रो कबड्डी लीगPro-Kabaddiप्रो-कबड्डीPuneri Paltanपुनेरी पल्टन