प्रो कबड्डी : दिल्लीचा 'दबंग' विजय; जयपूरवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 21:28 IST2019-08-05T21:26:18+5:302019-08-05T21:28:07+5:30

दिल्लीच्या संघाने खोलवर चढाया केल्या आणि त्याचबरोबर जोरदार बचावही केली.

Pro Kabaddi: Delhi's Victory over Jaipur | प्रो कबड्डी : दिल्लीचा 'दबंग' विजय; जयपूरवर विजय

प्रो कबड्डी : दिल्लीचा 'दबंग' विजय; जयपूरवर विजय

नवी दिल्ली : आज झालेल्या पहिल्या सामन्यात दिल्ली दबंगच्या संघाने जयपूर पिंक पँथर्सवर 35-24 असा दमदार विजय मिळवला.

दिल्लीच्या संघाने खोलवर चढाया केल्या आणि त्याचबरोबर जोरदार बचावही केली. या दोन्ही गोष्टींमध्ये दिल्ली जयपूरपेक्षा वरचढ ठरली. दिल्लीने यावेळी जयपूरचा संघ दोनदा ऑल आऊट केला.

Image

दिल्लीने या सामन्यात चढाईमध्ये 21 गुण मिळाले, तर जयपूरला 19 गुण मिळवता आले. दिल्लीने पकडींमध्येही जयपूरपेक्षा जास्त गुण मिळवले. दिल्लीने चढाईमध्ये आठ गुण मिळवले, पण जयपूरला पकडींमध्ये फक्त तीन गुण मिळवता आले.

Web Title: Pro Kabaddi: Delhi's Victory over Jaipur