FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 22:17 IST2025-12-11T22:17:17+5:302025-12-11T22:17:37+5:30
भारतीय संघाने दमदार कामगिरी, नऊ वर्षांचा दुष्काळ संपवत रचला इतिहास

FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
Prime Minister Congratulates India’s Men’s Junior Hockey Team : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ च्या एफआयएच हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या भारताच्या युवा हॉकी संघातील खेळाडूंना शाब्बासकी दिली आहे. हॉकी जगतातील प्रतिष्ठित स्पर्धा गाजवणाऱ्या संघाचे कौतुक करताना पंतप्रधान मोंदींनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
PM मोदींची युवा हॉकी संघासाठी खास पोस्ट
Congratulations to our Men's Junior Hockey Team on scripting history at the FIH Hockey Men’s Junior World Cup 2025! Our young and spirited team has secured India’s first-ever Bronze medal at this prestigious tournament. This incredible achievement inspires countless youngsters… pic.twitter.com/iEbPd2Jh1z
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2025
आपल्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये मोदींनी लिहिलं आहे की, "FIH हॉकी पुरुष ज्युनिअर विश्वचषक २०२५ स्पर्धेत इतिहास रचल्याबद्दल आपल्या भारतीय पुरुष ज्युनिअर हॉकी संघाचे हार्दिक अभिनंदन! आपल्या तरुण, जिद्दी आणि जोशपूर्ण संघाने या प्रतिष्ठित स्पर्धेत भारताचे पहिलेच कांस्यपदक जिंकत अभूतपूर्व यश मिळवले आहे. देशभरातील असंख्य तरुणांना प्रेरणा देणारी ही अफाट कामगिरी भारतीय हॉकीच्या नव्या युगाची सुरुवात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय युवा हॉकी संघाचं कौतुक केले आहे."
भारतीय संघाने दमदार कामगिरी, नऊ वर्षांचा दुष्काळ संपवत रचला इतिहास
चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या प्लेऑफ्सच्या लढतीत भारतीय संघाने अर्जेंटिनाला पराभवाचा दणका देत या स्पर्धेतील पदकी दुष्काल संपवला. दोन गोलसह पिछाडीवर असताना भारतीय संघाने अखेरच्या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवत अर्जेंटिनाला ४-२ असे पराभूत करत कांस्य पदक पटकावले. २०१६ नंतर भारतीय संघाने या स्पर्धेत पदक निश्चित केले.
भारतीय संघाने आतापर्यंत या स्पर्धेत दोन कांस्यपदके (२००१ आणि २००५) जिंकली होती. २०१६ मध्ये भारताने अंतिम फेरीत बेल्जियमचा पराभव करीत जेतेपदही पटकावले होते. यंदाच्या हंगामातील कांस्य पदकासह भारताने या स्पर्धेत पाचवे पदक पटकावले आहे.