शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रापाठोपाठ आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत आपटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 22:23 IST

दक्षिण आशियाई शरीरसौष्ठवालाही महाराष्ट्राचे बळ

मुंबई : देशातील सर्वात बलाढ्य राज्य संघटना म्हणून नावलौकिक असलेल्या महाराष्ट्रशरीरसौष्ठव संघटनेची ताकद आता आणखी वाढली आहे. राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे यांच्यावर आता दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जागतिक शरीरसौष्ठव संघटनेचे सर्वेसर्वा पॉल चुआ यांनी प्रशांत आपटे यांच्या निवडीची नुकतीच घोषणा करून महाराष्ट्र शरीरसौष्ठवाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

"आपल्या कार्यकालात दक्षिण आशियातील शरीरसौष्ठवाला आलेली मरगळ दूर करून पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचे आपले पहिले प्रयत्न असल्याचे आपटे म्हणाले. पॉल चुआ यांनी दिलेल्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेन," असा विश्वासही आपटे यांनी अध्यक्षपदाची सुत्रं स्वीकारताना व्यक्त केला. पुन्हा दिसणार 'दक्षिण आशियाई-श्री'चा थरारगेले काही वर्षे थंडावलेल्या 'दक्षिण आशियाई-श्री' स्पर्धेला पुन्हा एकदा चालना देण्याचे काम नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत आपटे करणार आहेत. त्यांनी अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारताच येत्या एप्रिल-मे 2019 दरम्यान नेपाळमध्ये 'दक्षिण आशियाई-श्री' स्पर्धा घेणार असल्याचे जाहीर केले. ते आतापासूनच या स्पर्धेच्या आयोजनाच्या तयारीला लागले आहेत. या स्पर्धेत दक्षिण आशियातील भारतासह, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव हे देशही सहभागी होणार आहेत. नेपाळपाठोपाठ 2020सालच्या दक्षिण आशियाई स्पर्धेचे यजमानपद मालदीवला देण्यात आल्याची माहिती आपटे यांनी याप्रसंगी दिली. 

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र