शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

पूजा, संगीता यांनी आत्मविश्वास दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 3:52 AM

प्रोरेसलिंग लीगमुळे अनेक भारतीय खेळाडूंचे जीवन बदलले आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. या स्पर्धेतून मिळालेले प्रेम, अनेक अविस्मरणीय अनुभव आम्ही भविष्यात आमच्या

साक्षी मलिक (लोकमत मुंबई महारथी)प्रोरेसलिंग लीगमुळे अनेक भारतीय खेळाडूंचे जीवन बदलले आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. या स्पर्धेतून मिळालेलेप्रेम, अनेक अविस्मरणीय अनुभव आम्ही भविष्यात आमच्या पुढील पिढीसोबत शेअर करु. मला खात्री आहे, की जे खेळाडू आज या लीगमध्ये सहभागी होऊ शकले नाही, त्यांनाही आमच्या इतकाच फायदा झाला असेल. जेव्हा या लीगमध्ये संघांची वाढेल तेव्हा नक्कीच त्यांनाही या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळेल. संघ आणि मल्ल यांची संख्या वाढल्यास नक्कीच नवी संधी मिळेल आणि यामध्ये सर्वाधिक फायदा भारतीय मल्लांचा होईल, यात शंका नाही.यंदा आतापर्यंतच्या प्रवासात माझा संघ लोकमत मुंबई महाराथी केवळ एक सामना जिंकण्यातयशस्वी ठरला आहे. त्यामुळे आता उपांत्य सामन्यात जागा मिळवण्यासाठी आम्हाला आमच्या उर्वरीत दोन्ही सामने जिंकावे लागतील. या गोष्टीची मलाआणि माझ्या संघाला जाणीव असल्याने आमच्यावर काहीसे दडपण नक्कीच आहे. तरी, मी माझ्या संघातील सर्व खेळाडूंना याबाबत जास्त विचार न करण्याचा सल्ला दिला आहे. विजय मिळवण्यासाठी आम्हाला आमचा सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. त्याचवेळी, जर का यंदा आम्ही उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरलो नाही, तर ही माझ्यासाठी अर्धवट मोहिम राहिल आणि पुढील वर्षी मी अधिक जोमाने नव्याने तयारी करेल.पूजा धांडा आणि संगीता फोगट यांची यंदाची कामगिरी जबरदस्त झाली असून त्यांचे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पूजाने वर्ल्ड आणि आॅलिम्पिक चॅम्पियन हेलेन मारौलिस हिला नमवल्यानंतर संगीताने वेनेसा कालाद्झींस्काया या आणखी एका वर्ल्ड चॅम्पियनला पराभूत केले.या दोन धक्कादायक विजयानंतर प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलली. या यशामुळे यादोघी प्रत्येकाच्या कौतुकासपात्र आहेत. या दोन्ही लढती मी प्रत्यक्षपणे पाहिल्या आणि मला आवर्जून सांगायचे आहे की या दोघींच्या खेळाने मी मंत्रमुग्ध झाले. यावेळी मी एक थरार अनुभवला आणि आता या दोघींची मी चाहती बनली आहे.खरं म्हणजे, या दोन्ही खेळाडूंचे मी आभार मानू इच्छिते. कारणया दोघींमुळे मला पुढील लढतीत अनास्तासिजिया ग्रिगोरजेवाविरुद्ध लढण्याचा आत्मविश्वास मिळाला. जर ते वर्ल्ड चॅम्पियनला नमवू शकतात, तर मी देखील अशी कामगिरी करु शकते, असाविश्वास मिळाला. माझी अखेरची लढत सरिताविरुद्ध होणारअसून तिला मी अनेकदा नमवलेआहे. त्यामुळे मी सुरुवातीपासून वर्चस्व राखू शकते असा विश्वास वाटतो.प्रो रेसलिंगचे आतापर्यंतचेसर्व सत्र आमच्यासाठी संस्मरणीय ठरले. पहिल्या सत्रात मी वेगळ्या संघात होते. त्यावेळी आमचेसर्व विजय एकतर्फी होते.प्रत्येक विजयाचा आम्ही जल्लोष केला असून प्रत्येक क्षण आम्हीएन्जॉय केला आहे. दुसºया सत्रात आमच्या संघातील बजरंग दुखापतग्रस्त झाल्याने आम्ही दुर्दैवी ठरलो. यंदाचे सत्रही आमच्यसाठी चांगले ठरले. सध्या आम्ही स्पर्धेचा आनंद घेत असून उर्वरीत दोन्ही सामन्यात आम्ही छाप पाडू.