कविता १२० व्या स्थानी
By Admin | Updated: August 15, 2016 05:48 IST2016-08-15T05:48:18+5:302016-08-15T05:48:18+5:30
भारताची ओ.पी. जैशा आणि कविता राऊत यांची रिओ महिला मॅरेथॉन स्पर्धेत कामगिरी निराशाजनक ठरली.

कविता १२० व्या स्थानी
रिओ : भारताची ओ.पी. जैशा आणि कविता राऊत यांची रिओ महिला मॅरेथॉन स्पर्धेत कामगिरी निराशाजनक ठरली. रविवारी झालेल्या स्पर्धेत जैशाला ८९ व्या तर कविताला १२० व्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिला मॅरेथॉनमध्ये एकूण १३३ धावपटू सहभागी झाल्या होत्या. त्यात दोन भारतीय धावपटूंचाही समावेश होता. जैशाने २ तास ४७ मिनिट १९ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली तर कविताने शर्यत पूर्ण करण्यासाठी २ तास ५९ मिनिट २९ सेकंद वेळ घेतला. भारतीय धावपटूंनी शर्यत पूर्ण केली ही दिलासा देणारी बाब ठरली.