शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

Tokyo Olympic : ऐतिहासिक विजयानंतर हॉकी संघाच्या कर्णधाराला PM मोदींचा फोन; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 6:52 PM

Indian Hockey Team, Tokyo Olympics 2020 : गेली 41 वर्षे भारतीय संघ ऑलिम्पिकच्या उपांत्य सामन्यात खेळला नव्हता. मात्र, टोकियोमध्ये भारताने केवळ उपांत्य फेरीच गाठली नाही, तर कांस्यपदकावरही कब्जा केला. आज संपूर्ण देश भारतीय हॉकी संघाचे कौतुक करत हा विजय साजरा करत आहे.

नवी दिल्ली - भारतीय पुरुष हॉकी संघाने आज जपानच्या भूमीवर इतिहास रचला. जर्मनीबरोबर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. गेली 41 वर्षे भारतीय संघ ऑलिम्पिकच्या उपांत्य सामन्यात खेळला नव्हता. मात्र, टोकियोमध्ये भारताने केवळ उपांत्य फेरीच गाठली नाही, तर कांस्यपदकावरही कब्जा केला. आज संपूर्ण देश भारतीय हॉकी संघाचे कौतुक करत हा विजय साजरा करत आहे. यातच, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही, हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि हॉकी संघाचे अभिनंदन केले. पंतप्रधानांच्या या फोनचा व्हिडिओही आता व्हायरल होत आहे. (PM Narendra Modi speaks to india hockey team captain manpreet singh and coach graham reid phone call video viral)

तुम्ही कमाल केली -पंतप्रधान नरेंद्र मोदी हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगच्या फोनवर बोलले. मनप्रीतसोबत बोलताना मोदी म्हणाले, "तुम्ही कमाल केली आहे आणि आज संपूर्ण देश नाचत आहे. संपूर्ण संघाने खूप मेहनत घेतली. माझ्यावतीने संपूर्ण संघाचे अभिनंदन करा." याच बरोबर, पंतप्रधान मोदींनी संघाच्या दोन्ही प्रशिक्षकांशीही संवाद साधला. तसेच, 15 ऑगस्टनिमित्त सर्व खेळाडूंना आमंत्रितही केले.

Tokyo Olympics: भारताच्या ऐतिहासिक यशाचे पाच हिरो, ज्यांनी संपवला ऑलिम्पिकमधील ४१ वर्षांपासूनचा पदकाचा दुष्काळ

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरूनही संपूर्ण संघाचे अभिनंदन केले होते. "ऐतिहासिक! असा दिवस जो प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात राहील. कांस्य पदक जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. भारताला आपल्या हॉकी संघाचा अभिमान आहे," असे ट्विट त्यांनी केले होते.

1980 नंतर जिंकलं ऑलिम्पिक पदक -यापूर्वी भारतीय हॉकी संघाने 1980 साली ऑलिम्पिकचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर भारताला एकाही ऑलिम्पिक स्पर्धेत पदकावर नाव कोरता आले नव्हते. मात्र, यावेळी ऑलिम्पिकमध्ये भारताने जबरदस्त कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. पण उपांत्य फेरीत भारताला २-५ ने पराभव पत्करावा लागला होता. यामुळे हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले होते. मात्र आज जर्मनीवर मात करत भारताने कांस्यपदकावर नाव कोरले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीHockeyहॉकीOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021IndiaभारतJapanजपान