खेळाडूंना मिळणार 50 डॉलरचा भत्ता
By Admin | Updated: September 17, 2014 01:52 IST2014-09-17T01:52:14+5:302014-09-17T01:52:14+5:30
आशियाडमध्ये सहभागी होणा:या भारतीय खेळाडूंना मिळणा:या दैनंदिन 50 डॉलर भत्त्यात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही.

खेळाडूंना मिळणार 50 डॉलरचा भत्ता
नवी दिल्ली : आशियाडमध्ये सहभागी होणा:या भारतीय खेळाडूंना मिळणा:या दैनंदिन 50 डॉलर भत्त्यात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. क्रीडा मंत्रलय आधीसारखाच भत्ता खेळाडूंना देईल. क्रीडा मंत्रलयाला अर्थ मंत्रलयाकडून परवानगी मिळाल्यानंतर हा भत्ता एकरकमी दिला जाणार आहे.
क्रीडा मंत्रलयाच्या अधिका:याने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रकुल स्पर्धेच्यावेळी देण्यात आलेल्या भत्त्याच्या रकमेत कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. अर्थ मंत्रलयाकडे या आशयाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परवानगी मिळताच इंचियोनमध्ये सर्व खेळाडूंना रक्कम वाटण्यात येईल.
ग्लास्गो राष्ट्रकुलदरम्यान दैनिक भत्ता 25 वरून 5क् डॉलर करण्यात आला होता; पण त्यापैकी ब:याचशा खेळाडूंना 25 डॉलर या हिशेबाने स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात रक्कम देण्यात आली होती. उर्वरित रक्कम अनेक खेळाडूंना अद्याप मिळालेली नाही. रोख रक्कम वाटण्याची जबाबदारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेची आहे. ही रक्कम शुक्रवारपूर्वी देण्यात येणार आहे. भारताने आशियाडमधील 28 क्रीडा प्रकारांसाठी 516 खेळाडू पाठविले आहेत. (वृत्तसंस्था)